शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

शेगाव तालुक्यातील दुष्काळी स्थितीबाबत नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 13:30 IST

शेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न  बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली.

- अनिल उंबरकार लोकमत न्युज नेटवर्कशेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न  बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. दुष्काळी परिस्थिती मुळे तालुक्यात अनेक गावांत निर्माण झालेल्या भीषण पाणी व चारा टंचाई निवारणार्थ तहसिलदार शिल्पा बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पं स सभागृहात सोमवारी  सरपंच व ग्रामसेवकांकडून गावनिहाय आढावा घेण्यासाठी  महत्वपूर्ण  सभा  पार पडली.याप्रसंगी नायब तहसीलदार डॉ सागर भागवत,पं स सभापती विठ्ठलराव पाटील,जि प सदस्य राजाभाऊ भोजने,पांडुरंग सावरकर,पं स उपसभापती सुखदेवराव सोनोने, सदस्य इनायतउल्ला खान, विठ्ठल सोनटक्के,निळकंठ पाटील,पांडुरंग शेजोळे,बीडीओ पी आर वाघ, मंडळ अधिकारी अशोक कडूकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये उपस्थित ग्रा पं सरपंच व ग्रामसेवक यांचेकडून गावनिहाय पाणी व चारा टंचाईचा आढावा घेऊन आवश्यक  उपाययोजना करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

चारा छावण्यासाठी मागितले प्रस्ताव.....शेगाव तालुक्यातील नागझरी, जुई,हिंगणे वैजनाथ,तोडा कसबा, वरूड, गव्हाण, तिंत्रव, भोनगाव, माटरगाव व अन्य गावात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून बैठकीत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. शेगाव तालुक्यात एकूण 66 गावे असून  सध्यस्थितीत शासनाकडून  तालुक्यातील 24 गावात 27 टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर 32 गावात 37 ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत करून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर याव्यतिरिक्त आणखी 5ते6गावात टॅकर द्वारे पाणी देण्यासाठी  प्रशासन विचारधिन असल्याची माहिती यावेळी पं. स. च्या पाणी पुरवठा विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विजय पवार यांनी दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावShegaonशेगाव