शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळखुटा तिहेरी खुनाचा तपास पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:23 IST

येत्या आठवड्यात प्रसंगी मलकापूर न्यायालयात या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रूक येथील माय-लेकींच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास बोराखेडी पोलिसांनी जवळपास पूर्ण केल्या असून येत्या आठवड्यात प्रसंगी मलकापूर न्यायालयात या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.पिंपळखुटा येथे १५ ऑक्टोबर रोजी आईसह तिच्या दोन मुलींची निर्घुणपणे हत्या झाल्याचे समोर आले होते.  सुमनबाई मालठाणे आणि त्यांच्या दोन मुली राधा मालठाणे व शारदा मालठाणे या तिघांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात गावातीलच आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर (३८) यास अटक करण्यात आली होती.  प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे राधा मालठाणे आणि शारदा मालठाणे या दोन्ही बहीणी गर्भवती असल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर समोर आले होते. मृत राधाच्या पतीने निधन झाल्यामुळे ती आठ ते दहा वर्षापासून ती माहेरी अर्थात पिंपळखुटा बुद्रूक येथेच राहत होती तर शारदाचाही घटस्फोट झाल्याने ती सुद्धा दीड वर्षापासून आई-वडिलांकडेच राहत होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य वाढले होते. तर हे मालठाणे कुटुंबिय आरोपी दादाराव म्हैसागर याच्याच शेतात मजुरीने काम करण्यासाठी जात होते. त्यातूनच आरोपी म्हैसागर व मृत राधाचे सुत जुळले होते. त्यातूनच राधाला गर्भधारणा झाली होती. त्यातूनच त्यांच्यात तक्रारी वाढल्या .

डीएनए अहवालाची प्रतीक्षाया प्रकरणाची क्लिष्ठता पाहता वैद्यकीय व तांत्रिक पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी मृतांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेत अमरावती येथील प्रयोग शाळेत अनुषंगीक नमुने पाठवले होते. अद्याप त्याचा रिपोर्ट प्राप्त झालेला नाही. तोही मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे ठाणेदार माधवराव गरुड यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा