शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव देवी प्रा.आ. केंद्रासाठी अडीच कोटी!

By admin | Updated: March 28, 2016 02:07 IST

हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नांना यश.

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील आरोग्य सुविधेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नातून पिंपळगावदेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन मुख्य इमारतीसाठी २.५0 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी ५0 लक्ष तरतूद तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.मोताळा तालुक्यात आरोग्य विषयक सुविधांचा मोठय़ा प्रमाणावर अनुशेष आहे. सदर अनुशेष लक्षात घेता, गेल्या वर्षभरात आ. सपकाळ यांनी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सुविधांचा प्रश्न शासनदरबारी सातत्याने लावून धरलेला आहे. त्यामध्ये भौतिक सुविधा बरोबरच रिक्त पदे व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपळगावदेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन मुख्य इमारतीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने इमारत बांधकामासाठी सुमारे २.५0 कोटी रुपयांची मान्यता प्रदान करण्यात आली असून, सन २0१५-१६ या वित्तीय वर्षामध्ये त्यासाठी रुपए ५0 लाख शासनाकडून १४ मार्च २0१६ च्या आदेशान्वये जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा फायदा परिसरातील जनतेला होणार आहे.दरम्यान, या सोबतच रोहिणखेड व कोथळी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबतचा प्रस्तावसुद्धा शासनदरबारी सादर करण्यात आलेला असून, विदर्भातील ग्रामीण भागातील दोन हजार खाटांचा आरोग्यविषयक अनुशेष लक्षात घेता या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. सपकाळ यांनी सांगितले.