खामगाव (जि. बुलडाणा): येथील टिळक मैदानात आइस्क्रीमची गाडी लावण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरुहोती.तीन दिवसांपूर्वी टिळक मैदानात एका युवकाने आइस्क्रीमची गाडी लावली होती. ही गाडी लावण्यास परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला होता. दरम्यान, सोमवारी पुन्हा या तरुणाने गाडी लावली. यामुळे वाद उफाळला आणि दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीत परिसरातील इमारतींच्या काचा फुटून, मडक्यांची तोडफोडही झाली. घटनेनंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त तैनात केला असून, आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती दरेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरु आहे.
खामगाव येथे दगडफेक
By admin | Updated: April 5, 2016 01:46 IST