शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गीतेमध्ये समस्त मानवांच्या जीवन विकासाचे तत्त्वज्ञान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:27 IST

गीता ही कोणत्याही धर्माची नसून, समस्त मानव समाजाच्या विकासाचा मार्ग त्यामध्ये दिला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हाच संदेश गीतेतून मिळतो. संपूर्ण जगातील मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्याचा मार्ग गीता दर्शवित असल्याचे मत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष तथा   श्री आचार्य लोणारकर मोठे बाबा  महानुभाव  यांनी व्यक्त केले.  

ठळक मुद्देलोणारकर महाराज यांचे उद्बोधनअखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदसर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गीता ही कोणत्याही धर्माची नसून, समस्त मानव समाजाच्या विकासाचा मार्ग त्यामध्ये दिला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हाच संदेश गीतेतून मिळतो. संपूर्ण जगातील मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्याचा मार्ग गीता दर्शवित असल्याचे मत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष तथा   श्री आचार्य लोणारकर मोठे बाबा  महानुभाव  यांनी व्यक्त केले.  अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव विद्यमाने सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव व राज्यस्तरीय श्रीमद् भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण २४ ऑगस्ट रोजी श्री गोपाल आश्रम, पंचकृष्ण मंदिर, अजिंठा रोड येथे पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य लोणारकर मोठे बाबा महानुभाव होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  पाथ्रीकरबाबा,  मेहकरकर बाबा मढ आश्रम,  लासूरकर बाबा जाळीचा देव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सोनपेठकरबाबा, माजी आमदार विजयराज शिंदे, गोविंदशेठ अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय भगवतगीता स्पर्धेतील गीतेतील १ ते ९ अध्यायातील पहिले बक्षीस न्यू ईरा हायस्कूल, जळगाव जामोद येथील आशीष राजगुरे, द्वितीय श्री सर्मथ स्कूल वाशिम येथील हर्षदा रवींद्र ढोणे, तृतीय नगर जिल्हय़ातील ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलमधील इनामदार दाऊद गफूर, दत्तमंदिर हुडको, जि. नगर येथील गोविंद प्रभाकर केसकर, शिक्रापूर पुणे येथील अश्‍विनी नितीन सायज यांना देण्यात आले. तसेच गीतेतील १0 ते १८ अध्यायातील  दुसर्‍या भागातील पहिले बक्षीस सचिन संजय धवने, द्वितीय योगिता नरेंद्र सव्वालाखे, तृतीय हर्षद रवींद्र बोडखे, तृतीय दामिनी वसंतराव खोडके, ऋतुजा संजय सराफ यांना देण्यात आले. यावेळी  पाथ्रीकरबाबा,   मेहकरकर बाबा मढ आश्रम,  लासूरकर बाबा जाळीचा देव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सोनपेठकरबाबा यांनी मार्गदर्शन केले. संचालन धनंजयदादा लोणारकर व प्रवीणदादा लोणारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदशेठ अग्रवाल यांनी केले. यावेळी संपूर्ण राज्यभरात भाविक दाखल झाले होते.