शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडीयावर बनावट व्हीडीओ व्हायरल; मलकापूर नगराध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:31 IST

मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांच्या विरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात १८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा: कोरोना संसर्गाच्या संदर्भाने बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात असलेल्या क्वारंटीन रुग्णांना कथितस्तरावर योग्य सुविधा मिळत नसल्याचा बनावट व्हीडीओ तयार करून तो समाज माध्यमांवर प्रसारीत केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांच्या विरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात १८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथ रोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांच्या कलमाचा आधार घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील संदिग्ध रुग्ण आणि कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना ठेवण्यात येते. तेथील रुग्णांना योग्य पद्धतीने सुविधा मिळत नसल्याबाबतची एक चित्रफीत नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ यांनी काढून समाज माध्यमांवर ती प्रसारीत केली होती. १२ एप्रिल रोजी ही घटना घडली होती.

दरम्यान, संबंधीत चित्रफीत जिल्ह्यातील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. प्रकरणी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे आणि तहसिलदार संतोष शिंदे यांना स्त्री रुग्णालयाची पाहणी करून समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आलेल्या व्हीडीओ मधील सत्यतेची पडताळणी केली. दरम्यान, यासंदर्भातील सविस्तर अहवाल हा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला होता. त्यामध्ये संबंधीत अहवालावरून जिल्ह्यातील हॉस्पीटल क्वारंटीन म्हणून स्त्री रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथील व्यवस्था ही व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कृत्य नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी केल्याच्या कारणावरून या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.जिल्हाधिकारी यांनी प्रकरणी आदेश दिले होते. प्रकरणात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५२, ५४ आणि साथ रोग प्रतिबंदक कायद्याच्या कलम तीन आणि तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ एप्रिलच्या मध्यरात्री व १८ एप्रिल उजाडतांना बुलडाणा शहर पोलिसांनी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंके हे करीत आहेत. दरम्यान, या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाºयानेही अनुषंगीक गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कारणे दाखवा नोटीसही होती बजावली

अ‍ॅड. हरीश रावळ यांना या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन दिवसापूर्वी एक कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागण्यात आले होते.

टॅग्स :Malkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या