शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढला;शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 18:43 IST

गतवर्षी पेक्षा १७५ कोटी रुपये जादा पीक कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचा टक्का गेल्या पाच वर्षातील निच्चांकी पातळीवर असताना तो वाढविण्यासाठी प्रसंगी बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची स्थिती पाहली असता गतवर्षी पेक्षा १७५ कोटी रुपये जादा पीक कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे फौजदारी कारवाईची मात्रा सध्या चांगलीच लागू पडत असल्याचे दिसत आहे.शासनाने कर्जमाफीचा लाभ देउन शेतकºयांना दिलासा दिला. मात्र, अनेक शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळूनही नविन पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे, पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेउन ३० जून पर्यंत शेतकºयांना कर्ज वाटप न केल्यास दिरंगाई करणाºया बँकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्र्यांच्या इशाºयानंतर राष्टीय कृत बँकासह खासगी बँकांनीही कर्ज वाटपाची गती वाढवल्याने बहुतांश शेतकºयांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा करण्यात आली आहे. १० जुलै पर्यंत १ लाख ४० हजार २३६ शेतकºयांना ९३४.२९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे, शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी ६२ हजार ५९१ शेतकºयांना ५११ कोटी ३१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात हे कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी खरीप हंगामात ३ लाख ६२ हजार ८२६ शेतकºयांना कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. तसेच १ लाख ९३ हजार ९१६ शेतकरी पीक कर्जासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८४ हजार १०६ शेतकºयांयना ६७० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकºयाना पीक कर्ज देण्यात येणार आहे. त्याविषयी जिल्ह्यातील सर्व बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. बँकांना दिलेल्या उद्दीष्टानुसार कर्जवाटप सुरू आहे. आतापर्यंत ६२ हजार शेतकºयांना ५११ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वापट करण्यात आले आहे.उत्तम मनवर,व्यवस्थापक, अग्रणी बँक

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्ज