शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:34 IST

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाला जनचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे, असे मत कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड या महत्वाकांक्षी योजनेला यश मिळण्यासाठी जनचळवळ आवश्यक आहे. तशी मानसिकता सर्वांची तयार झाल्याने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाला जनचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे, असे मत कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले. ते सामाजिक वनीकरण व वनविभाग यांच्यावतीने आयोजित सातपुड्याचे निसर्ग स्वप्न महावृक्षारोपण या कार्यक्रमात उद्घाटक पदावरून बोलत होते.रसुलपूर ग्रामपंचायतीमधील निमखेडी शिवारात एकुण २५ हजार झाडांच्या गट वृक्षलागवडीसाठी महावृक्षारोपणाचे आयोजन करीत परिसरात श्रमदानाचे तसेच ‘एक व्यक्ती एक झाड’ संगोपनाचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी ना.डॉ.संजय कुटे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी संजय पार्डीकर, उपवनसंरक्षक संजय माळी, जि.प. सदस्य रूपाली काळपांडे व मंजुषा तिवारी, सरपंच शमुन्नीसा महमद, उपविभागीय महसुल अधिकारी वैशाली देवकर, श्री कोटेक्सच्या संचालिका डॉ.अपर्णा कुटे, तहसिलदार डॉ.शिवाजी मगर, मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे, पोलीस निरीक्षक सुनील जाधव, तरूणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान यांची प्रमुख उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)वृक्ष दिंडी व वृक्षारोपण!सर्वप्रथम आदिवासी परंपरेप्रमाणे महिलांनी ना.डॉ.संजय कुटे यांचे औक्षण केले आणि वृक्षदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी गोंधह, भजन व पावली टाकत वृक्षदिंडीची वाटचाल करण्यात आली. स्वत: ना.डॉ.संजय कुटे व त्यांच्या पत्नी डॉ.अपर्णा कुटे यांनी वृक्षपालखी खांद्यावर घेतल्याने सर्वांमध्ये उत्साह संचारला.

रेनवॉटर हार्वेस्टींग उपक्रम राबवाजळगाव व संग्रामपूर तालुक्यात जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी जिरविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केंद्राच्या जलशक्ती विभाग येथे पायलट प्रोजेक्ट राबवित आहे. त्याला प्रतिसाद देत रेनवॉटर हार्वेस्टींग उपक्रम प्रथम शासकीय कार्यालयांनी व नंतर जनतेनी राबवावा, ही सुध्दा एक लोकचळवळ बनावी, असे मत ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदDr. Sanjay Kuteडॉ. संजय कुटे