शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळी कालवा, भुसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:13 IST

Buldhana News : पांढरदेव, घानमोड, मानमोड या गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पेनटाकाळी प्रकल्पाचा कालवा गेल्या वर्षी फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अद्यापही हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर गांभिर्याने घेतल्या गेलेला नाही. यासोबतच पांढरदेव, घानमोड, मानमोड या गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न कायम आहे. प्रकल्पाच्या ४१६ कोटी ५९ लाख रुपयांची सुप्रमा मंजूर झालेली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत.गेल्या दोन दिवसापुर्वी खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थिततीत या प्रकल्पाशी संबंधित अडचणी, कालव्याचे प्रश्न, भुसंपादनाचे प्रश्न आणि तीन गावांच्या पुनर्वसनासंदर्भात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे किमानपक्षी हा विषय प्रशासनाच्या लिस्टवर आलेला आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पेनटाकळी प्रकल्पातंर्गत दुधा शिवारातील मुख्य कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यासोबतच प्रकल्पावरील १४ किमीच्या मुख्य कालव्यातून पाणी झिरपून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान फुटलेला हा कालवा दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यावेळी शेतकऱ्यांनी अटकाव केला होता.पेनटाकळी प्रकल्पाद्वारे जवळपास १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. प्रकल्प पूर्णत्वास केला असला तरी कालव्यांची काही भुसंपादनाची प्रकरणे, तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. या मुद्द्यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा करण्यात येऊन या प्रश्नी त्वरेने मार्ग काढण्यासंदर्भात हालचाली करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

बाधितांनाही नुकसान भरपाईची प्रतीक्षागेल्यावर्षी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामध्ये पाच शेतकऱ्यांचे नुकसान मोठे होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. दाेन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आली हाेती.कालव्याची दुरुस्ती गरजेचीपेनटाकळी प्रकल्पावरील मुख्य कालव्याची क्षमता ही ८.१८ क्युसेक आहे. पण गेल्या वर्षी २.७ क्युसेक एवढाच पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतरही कालव्याला भगडाद पडले होते. त्यामुळे प्राधान्य क्रमाने हा कालवा दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प