शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण दुपटीचा वेग २५ दिवसांवर; चाचण्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:30 IST

कोरोना बाधीतांचा आकडा चार हजाराच्या पुढे गेलेलो असतानाच रुग्ण दुपाटीचा वेग सरासरी २५ दिवसावर येवून ठेपला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा चार हजाराच्या पुढे गेलेलो असतानाच रुग्ण दुपाटीचा वेग सरासरी २५ दिवसावर येवून ठेपला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची व्याप्ती जिल्ह्यात वात असून कोरोना बाधीतांचा मृत्यूदरही १.४० टक्क्यावर आला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक मलकापूर तालुक्यात असून येथील मृत्यूदर ४.२९ टक्क्यांवर गेला आहे तर बुलडाणा तालुक्यात हा दर २.८८ आहे.एकूण झालेल्या तपासण्या आणि बाधीत रुग्णांची संख्या यांचा विचार करता जिल्हयात प्रती १०० व्यक्तींमागे १५.३० टक्के व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक २३.७७ टक्के प्रमाण हे चिखली तालुक्यात असून त्या खालोखाल खामगाव तालुक्यात २१.३० टक्के व्यक्ती बाधीत आढळून येत आहे. जिल्ह्यात आतापयंत २३,९९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून त्याच्या तुलना करता उपरोक्त प्रमाण आहे. संपलेल्या एका आठवड्यात जिल्ह्यात २,४४३ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्याचाही वेग जिल्ह्यात वाढला आहे.दुसरीकडे जिल्हयात बाधीत रुग्णांची एकूण संख्या पाहता तपासणी झालेल्यांपैकी १४.०२, चिखलीमध्ये २३.७७, देऊळगावराजात १३.४१, सिंदखेड राजामध्ये ९.४३, मेहकरमध्ये १६.१७, लोणारमध्ये १२.०९, खामगावमध्ये २१.३०, शेगावमध्ये १४.१७, मलकापूरमध्ये १३.०१, मोताळ््यात १९.२६, नांदुºयामध्ये १२.५९, जळगाव जामोदमध्ये ११.३९ आणि संग्रामपूर तालुक्यात ९.१३ टक्के व्यक्ती बाधीत म्हणून आढळून येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्हह्यात कोरोनाच्या संक्रमणाची व्याप्ती वाढली आहे. दररोज १०० च्या जवळपास रूग्ण आढळून येत आहेत.

५६६ खाटा उपलब्ध

 जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड हॉस्पीटलमधील एकूण खाटांचा विचार करता ३४ टक्के खाटांचा उपयोग बाधीत व संदिग्ध रुग्णासाठी वापरण्यात येत आहे. अद्यापही १,५६६ खाटा रिकाम्या आहेत. त्यामुळे आगामी काळात संसर्गाची व्याप्ती वाढण्याची भीती पाहता प्रशासकीय पातळीवर रुग्णांसाठी गरजेनुरूप खाटा उपलब्ध असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

चिखलीत रुग्ण वाढीचा वेग दहा दिवसावररुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिखली तालुक्यात दहा दिवसावर आला असून मोताळा तालुक्यात तो १३ दिवसावर आहे. नांदुरा, जळगाव जामोद तालुक्यात १४, खामगाव, देऊळगाव राजात १५, बुलडाण्यात १७, संग्रामपूरमध्ये १८, सिंदखेड राजा आणि लोणारमध्ये २०, शेगावात २२, मेहकरमध्ये २७ आणि मलकापूरमध्ये तो ३३ दिवसांवर आला आहे. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी वेग हा २५ दिवसावर सध्या आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या