या गावांमध्ये पेच
मेहकर तालुक्यातील आरेगाव येथे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी सरपंचपद राखीव झाले आहे. मात्र, या प्रवर्गांचा सदस्यच निवडून आलेला नाही. तसेच बुलडाणा तालुक्यात देऊळघाट येथे अनुसूचित महिलेसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. तसेच माेताळा तालुक्यातील काेथळी येथे अनुसूचित जमातीसाठी, खामगाव तालुक्यातील गावंढाळा येथे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी तर लाेणार तालुक्यातील गाेत्रा येथे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सरपंचपद राखीव झाले आहे. ग्रामपंचायतींमध्ये या प्रवर्गाचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
आरक्षण बदलून मिळणार
सरपंच आरक्षण निघालेले सदस्य नसलेल्या ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलून मिळणार आहे. सरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त हाेतील. त्यानंतर त्या गावांचे आरक्षण बदलवून देण्यात येणार आहे.
अनेकांना लागणार लाॅटरी
जिल्ह्यातील काही गावांमध्ये पॅनलकडे बहुमत नसले तरी ज्या प्रवर्गांचा सरपंच आहे त्या प्रवर्गाचा सदस्य आहे. त्यामुळे, या सदस्यांची सरपंचपदी अविराेध निवड हाेणार आहे. कारण सरपंचपदासाठी ज्या प्रवर्गाचे असेल त्याच प्रवर्गाच्या सदस्याला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, एकमेव अर्ज आल्याने अल्पमतात असलेल्या पॅनलच्या सदस्याचीही अविराेध निवड हाेणार आहे. त्यामुळे, अशी स्थिती असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अनेकांना सरपंचपदाची लाॅटरी लागणार आहे.