डोणगाव (बुलडाणा) : येथील बस स्थानक व स्टेट बँक शाखा राज्य महामार्गाला लागूनच आहे. त्यामुळे बस स्थानक व स्टेट बँकेत येणारे नागरिक आपली वाहने राज्य महामार्गावरच उभी करीत आहेत. ह्यपार्किंग झोनह्ण बनलेल्या या परिसरात उभ्या केल्या जाणार्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाह तुकीची कोंडी निर्माण होत आहे. डोणगाव हे राज्य महामार्गावरील गाव असून, याच राज्य महामार्गावर बस स्थानकासमोर स्टेट बँकेचे शाखा कार्यालय आहे. स्टेट बँक व बस स्थानकासमोर नेहमी वाहनांची वर्दळ असते. गत काही दिवसांपासून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे स्टेट बँकेत येणारे ग्राहक व बस स्थानकावर येणारे वाहनधारक स्टेट बँक परिसरातच वाहने उभी करत आहेत. दुचाकींची ही पार्किंग राज्य महामार्गावरही येते. बसस् थानकापासून २00 मीटरच्या आत कोणीही वाहन पार्क करू नये, असा शासकीय नियम आहे. परं तु, स्टेट बँकेत येणार्या ग्राहकांची वाहने सर्रास बसस्थानक व स्टेट बँकेच्या परिसरात उभी केली जातात. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक वारंवार व्यक्त करीत आहेत.
स्टेट बँक परिसर बनला पार्किंग झोन
By admin | Updated: October 14, 2014 00:21 IST