खामगाव : विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर त्यादिवशीपासूनच आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. मात्र तरीही अनेक एस.टी.बसेसवर तसेच बसस्थानकावर शासनाच्या जाहिरात अद्यापही ह्यजैसे-थेह्ण च आहेत. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप होत आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी दोन दिवसात विविध राजकीय पक्ष तसेच शासनाच्या योजनांबाबत जाहिरात देणारे फलक काढण्यात यावे, अशा सूचना आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख तथा शेगाव तहसीलदार डॉ.रामेश्वर पुरी यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता लावण्यात आली आहे. त्यामुळे मतदार संघात गावागावात तसेच शहरात झळकणारे भूमिपूजन, लोकार्पण, शासनाच्या योजनाबाबत जाहिरात असलेले फलक तसेच विविध पक्षाचे फलक हटविण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने खामगाव विधानसभा म तदार संघात आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख डॉ.रामेश्वर पुरी यांनी आज आचारसंहि तेचा भंग होईल असे शहरातील फलक काढण्यासंदर्भात नगर पालिकेला तसेच ग्रामीण भागातील फलक काढण्यात संदर्भात किंवा झाकण्यासंदर्भात पंचायत समितीला आदेश दिले आहेत. मात्र तरीही खामगाव तसेच शेगाव बसस्थानकावर शासनाच्या योजनांबाबत जाहिरात देणारे फलक अद्या पही जैसे-थे च आहेत. तर अनेक बसवरील जाहिराती सुध्दा मिटविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
फलक झाकण्याच्या सूचना
By admin | Updated: September 17, 2014 00:51 IST