शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल-मे महिन्यात पंचायत राज समिती बुलडाण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:37 IST

The Panchayat Raj Committee : वार्षिक प्रशासन अहवालाची पाहणी करून जिल्हा परिषदेस ही समिती भेट देणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : महाराष्ट्र विधिमंडळाची पंचायत राज समिती एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात येत असून जिल्हा परिषदेच्या  २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाची पाहणी करून जिल्हा परिषदेस ही समिती भेट देणार आहे. यासंदर्भातील पंचायत राज समितीचा कार्यक्रम महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांनी दिला दिला असून ३० सदस्यीय ही समितीमधील किती सदस्य प्रत्यक्षात बुलडाणा जिल्हा परिषदेतंर्गतच्या वार्षिक प्रशासन अहवालाची पाहणी करण्यासाठी येतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी पंचायत राज समिती ही २०१६ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात आली होती. त्यावेळी पंचायत राज समितीने जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेने केलेल्या कामांची पाहणी केली होती. या समितीचा हा दौरा त्यावेळी चांगलाच चर्चेत राहला होता. दरम्यान, आता पुन्हा चार वर्षांनंतर ही समिती बुलडाणा जिल्हा परिषदेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, ही समिती २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात जिल्हा परिषदेला भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व तर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष एप्रिल-मे महिन्यादरम्यान घेणार आहे. त्यामुळे संबंधित वर्षाच्या अहवालांच्या किमान पाच प्रती जिल्हा परिषद प्रशासनास तयार ठेवाव्या लागणार आहे.समितीवर कोरोना संसर्गाचे सावटप्राथमिक स्वरुपातील पंचायत राज समितीचा हा दौरा जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाला असल्याची माहिती आहे. मात्र, कोरोनाची साथ आणि तिचा होत असलेला प्रसार ही बाब विचारात घेऊन आ. डॉ. संजय रायमुलकर हे समिती प्रमुख असलेल्या या पंचायत राज समितीचा हा दौरा होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनास अहवाल व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा