शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पळशी व मलकापूर ग्रामीणची २४ मार्चला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:07 IST

बुलडाणा: खामगांव तालुक्यामधील पळशी बु. आणि मलकापूर तालुक्यामधील मलकापूर ग्रामीण या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकबुलडाणा: खामगांव तालुक्यामधील पळशी बु. आणि मलकापूर तालुक्यामधील मलकापूर ग्रामीण या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत संपणार आहे. दरम्यान, मेहकर तालुक्यातील वडाळी व संग्रामपूर तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या पोट निवडणूकीचाही कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमी ग्रामपंचायतींच्या निवडणूका असल्याने त्यासाठीची आचार संहिता ही संपूर्ण जिल्ह्यात लागू होणार नाही.  परंतु, ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सिमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहीता लागू राहील. निवडणुकीचा निकाल जाहीर होईस्तोवर ही आचार संहिता लागू राहणार आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमपाच मार्च ते नऊ मार्चला सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारल्या जाणार आहेत. २४ मार्चला सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान होईल. २५ मार्च रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूकीची अधिसूचना संबंधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत