शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

पालथे झोपून वाढवता येईल ऑक्सिजनची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : सध्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे; परंतु ऑक्सिजनचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. त्यातच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : सध्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे; परंतु ऑक्सिजनचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. त्यातच गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास धावाधाव करावी लागते. त्यामुळे गृह अलगीकरणातील रुग्णांनी घरीच पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढू शकते, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे घरच्या घरी उपचार घेऊन बरे होण्यासाठी हा उपाय लाभदायी ठरत आहे.

आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: गृह अलगीकरणात असलेल्यांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी होतो. पाठ बेडवर टेकवून उताणे झोपलेल्या रुग्णाला हळुवारपणे पोटावर झोपविण्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ऑक्सिजनेशन नीट व्हावे म्हणून पालथे झोपविणे या पद्धतीचा स्वीकार आधुनिक वैद्यकशास्त्राने केल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, तसेच रुग्ण जर गृह अलगीकरणात असेल, तर त्याच्या ऑक्सिजनच्या तपासणीबरोबरच तापमान, ब्लेडप्रेशर आणि रक्तातील साखरेची पातळी याची नियमित तपासणी केली जाते. रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणाऱ्या कमतरतेचे निदान झाले नाही, तर गुंतागुंत वाढते. वेळेवर पालथे झोपविल्यास श्वसनास मदत होते. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत, असाही तज्ज्ञांचा अनुभव आहे. त्यामुळे रुग्णांना पालथे झोपण्याचा फायदा होईल.

तर पालथे झोपू नये

गरोदर असलेल्या महिलांनी पालथे झोपू नये. डीप व्हेन थ्रोबासिससारखे आजार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयाचे गंभीर आजार, पाठीचे मणके, कटिबंध, मांडीचे हाड यांचे फ्रॅक्चर असल्यास, अशा रुग्णांनी पालथे झोपू नये, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन

पालथे झोपताना एक उशी मानेखाली. दोन उशा छातीखाली, तर दोन चेहऱ्याखाली ठेवाव्यात, अर्धा ते दोन तास पालथे व नंतर तेवढाच वेळ उजव्या कुशीवर झोपावे. नंतर अर्धा तास उठून बसावे व अर्धा तास ते दोन तास डाव्या कुशीवर झोपावे. नंतर पुन्हा पालथे झोपावे, अशाप्रकारे वारंवार स्थिती बदलणे उपयुक्त ठरते. हे दिवसात अनेकवेळा करावे.

असे होतील फायदे

शरिरातील ऑक्सिजनचा स्तर ९५च्या पुढे असणे आवश्यक आहे; परंतु कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांचा ऑक्सिजनस्तर जर त्यापेक्षा कमी असेल आणि ते रुग्ण गृह अलगीकरणात असतील, तर त्यांनी पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. त्यामुळे शरिरातील ऑक्सिजनचा स्तर चांगला वाढतो; परंतु लक्षणे जर तीव्र स्वरूपात असतील, तर त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

जेवणानंतर झोपू नका

जेवणानंतर कमीत कमी तासभर तरी पालथे झोपू नका. जोपर्यंत तुम्हाला सहन होईल, तोपर्यंतच पालथे झोपा. एखाद्या व्यक्तीला २४ तासही पालथे झोपणे शक्य होते; परंतु काहींना अर्ध्या तासातच कंटाळल्यासारखे होते. त्यामुळे आपल्या क्षमतेप्रमाणे पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.