शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी आली निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:58 IST

Buldhana News ऑक्सीजनची मागणी तथा वापर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. 

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कोराना बाधीत रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सीजनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणाच तणावाखाली आली होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी तथा वापर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आल्याचे एकंदरीत चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत १.५ मेट्रीक टन ऑक्सीजन नियमित स्वरुपात जिल्ह्यात उपलब्ध होत आहे. दुसरीकडे प्रारंभी जिल्ह्यात दररोज जेथे ११० ते १२० दरम्यान ऑक्सीनज सिलींडरची बुलडाण्यातील कोवीड समर्पीत रुग्णालयात गरज लागत होती. तेथे आजच्या घडीला केवळ ६४ ऑक्सीजन सिलींडर लागत आहे. त्यामुळे ऑक्सीजनचा जिल्ह्यातील तुटवडा संपुष्टात आला आहे. यायाच अर्थ जिल्ह्यात कारोना बाधीत असलेले तथा गंभीर असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १२२ कोरोना बाधीतांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून १.३० टक्क्यांच्या आस हे कोरोना बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. गेल्या एक महिन्यापासून ये १.३० ते १.५० टक्क्यांच्या आसपास स्थिर असल्याचे निदर्शनास आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा युद्ध पातळीवर अैारंगाबाद येथून बुलडाणा जिल्ह्यासाठी ऑक्सीजन सिलींडर मागविण्यात आले होते. ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याने थेट अन्न व अैाषध प्रशासन विभगास यात हस्तक्षेप करावा लागला होता.

३५ रेडेसिवीर इंजेक्शनची दररोज गरजरेमडेसिवीर इंजेक्शनची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी कोवीड समर्पीत रुग्णालयातील एका कक्ष सेवकाला बडतर्फ करण्यात आल्यानंतर हे इंजेक्शनही जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, यादृष्टीने आरोग्य विभागासोबतच अन्न व अैाषध प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर वर्तमान स्थितीत  जिल्ह्यात १,१४५ इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध असून समर्पीत कोवीड रुग्णालयात १०२४ पर्यंत त्यांची संख्या आहे. बुलडाणा जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत प्रतिदिन ३५ रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज भासते. गेल्या दोन दिवसापूर्वीतर हे प्रमाण शुन्यावर होते, असे अन्न व अैाषध प्रशासन विभागातील सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या