शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अंधत्वावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:41 IST

चिखली: नियतीने डोळय़ातली प्रकाशज्योती हिरावून घेतल्याने  अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी साधे जगणोही खडतर होऊन  बसते; मात्र तालुक्यातील एकलारा येथील देशमुख परिवाराच्या  सूनबाई असलेल्या जन्मांध कांचनमाला विनोद देशमुख यांनी  नशिबी आलेल्या जन्मजात अंधत्वावर मात करून जागतिक  क्षितिजाला गवसणी घातलेली आहे.

ठळक मुद्देजागतिक जलतरणपटू कांचनमाला देशमुखजन्मांध असुनही थक्क करणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: नियतीने डोळय़ातली प्रकाशज्योती हिरावून घेतल्याने  अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी साधे जगणोही खडतर होऊन  बसते; मात्र तालुक्यातील एकलारा येथील देशमुख परिवाराच्या  सूनबाई असलेल्या जन्मांध कांचनमाला विनोद देशमुख यांनी  नशिबी आलेल्या जन्मजात अंधत्वावर मात करून जागतिक  क्षितिजाला गवसणी घातलेली आहे. अंधांसाठीच्या जलतरण स् पध्रेत राष्ट्रीय व अंतराराष्ट्रीय स्तरावर पदकांचे शतक पार केलेल्या  कांचनमाला  देशमुख सध्या जागतिक जलतरण अजिंक्यपद स् पर्धेची तयारी करीत असून, त्यांचा आजवरचा प्रवास सर्वांसाठी  प्रेरणादायी आहे. अमरावती येथील पांडे कुटुंबात जन्मलेल्या कांचनमाला यांचे  वडील स्वत: हॉकीपटू होते. जन्मांध मुलीला क्रीडा क्षेत्रात नै पुण्यापर्यंत पोहचविण्याचे स्वप्न त्यांच्या वडिलांनी त्यांच्या बाल पणीच पाहिले. कांचनमालासुद्धा दृढ संकल्प आणि जिद्द राखून  ते स्वप्न साकार करीत आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी  पोहायला सुरुवात केली. आपल्या अंधत्वाच्या र्मयादा पार करून  अनेकदा त्यांनी खुल्या गटातील स्पर्धांमध्येही डोळस प्रतिस् पध्र्यांनासुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवलेली आहे.  राष्ट्रीय स्तरावर तब्बल ११0 पदके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर  १0 पदके मिळवून कांचनमाला यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले  आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ ११ व्या वर्षी  कांचनमाला देशमुख यांनी समुद्रातील सात किमी. अंतर १ तास   १४ मिनिटात पार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये  आपले नाव नोंदवले असून, त्यांचा हा विक्रम मागील १७ वर्षात  कोणीही मोडू शकले नाही. अंगभूत गुणवत्ता ठासून भरलेल्या  कांचनमाला देशमुख सध्या अंधांसाठीच्या जागतिक जलतरण  अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करीत आहेत. या स्पर्धेसाठीची पात्नता  फेरी त्यांनी यशास्वीपणे पार केली आहे. असे करणार्‍या त्या  दुसर्‍या भारतीय महिला जलतरणपटू आहेत. ‘आपण कोणत्याही  क्षेत्नात काम करीत असू, त्या क्षेत्नाला युद्धभूमी समजून तेथे आ पले सर्वोत्तम प्रदर्शन करा’, हा त्यांचा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणा  देणारा ठरतो. शारीरिक कमतरतेवर मात करून येथवर  पोहचलेल्या कांचनमाला यांच्या वाटचालीत वडील आणि पतीची  लाभलेली साथदेखील तेवढीच महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. ‘ पालकांनो, आपल्या मुलांना खेळू द्या, बागडू द्या, बहरू द्या. मा तीशी असलेली त्यांची नाळ तोडू नका’, अशी कळकळीची  विनंती कांचनमाला सर्वांना करीत असतात. यातून त्यांचे परिपक्व  व्यक्तिमत्त्व डोकावते. म्हणूनच जन्मजात अंधत्वावर मात  करून जागतिक क्षितिजाला गवसणी घालणार्‍या सागरकन्या  कांचनमाला देशमुख सध्या त्यांच्या राष्ट्रीय स्पध्रेसाठी कसून  सराव करीत आहेत. 

जलधी तरण तलावाची प्रशंसाएकलारा येथील देशमुख परिवाराच्या सूनबाई असलेल्या  कांचनमाला विनोद देशमुख या सध्या नागपूर येथे भारतीय  रिझर्व्ह बँकेत कार्यरत आहेत. दिवाळीचा सण साजरा  करण्यासाठी त्या आपल्या सासरी म्हणजे एकलारा येथे आल्या  होत्या. अगदी दिवाळीचा सुटीचा काळदेखील व्यर्थ जाऊ न देता  त्यांनी आपली तयारी जोरात सुरू ठेवली आहे. येथे जवळपास  कुठे स्विमिंग पूल आहे का, याची चौकशी त्यांनी केली असता,  जलधी तरण तलावाची माहिती त्यांना मिळाली. देशमुख  कुटुंबीयांनी जलधीचे संचालक सतीश गुप्त यांच्याशी संपर्क  साधून कांचनमाला यांच्या सरावासाठी विचारणा केली असता  गुप्ता यांनी आनंदाने तयारी दाखवली. कांचनमाला यांनी जलधी  तरण तलावात दोन दिवस पोहण्याचा मनसोक्त सराव केला.  भारतासह विदेशातील अत्याधुनिक स्विमिंग पूलमध्ये जलतरण  केलेल्या या अनुभवी जलतरणपटूने चिखलीसारख्या तालु क्याच्या गावात एवढा अद्ययावत स्विमिंग पूल असल्याबद्दल  सुखद आश्‍चर्य व्यक्त केले. येथील गुणवत्ता, व्यवस्था आणि  सुरिक्षतता या गोष्टींची त्यांनी प्रशंसा केली. 

टॅग्स :Sportsक्रीडा