पिंपळगाव सराई : बुलडाणा तालुक्यातील रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळगाव-सराई, रायपूर, सिंदखेड या गावांमध्ये गत आठ दिवसांपासून काेराेनाचा उद्रेक झाला आहे़. आठ दिवसांत ५ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला असून, ९० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़
रायपूर प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे़. आठ दिवसांत पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यामध्ये दोन तरुणांचा समावेश आहे़. रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने गेल्या आठ दिवसांत रायपूर, पिंपळगाव, सराई, भडगाव, नांद्राकोळी, शिरपूर या उपकेंद्रांवर नागरिकांची रॅपिड टेस्ट केली असता, ७८० नागरिकांपैकी ९० नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत़. या परिसरात कोरोनाचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़. रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण सोळा गावे आहेत़. त्यापैकी रायपूर, पिंपळगाव-सराई, सिंदखेड मातला या गावांमध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत़, त्यामुळे, या गावाकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे़. काेराेनामुळे पिंपळगाव-सराई येथील दोन, रायपूर येथील दोन आणि सिंदखेड येथील एकाचा मृत्यू झाला आहे़. मृतांमध्ये युवकांचाही समावेश असल्याने ग्रामस्थांनी काेराेनाची धास्ती घेतली आहे़.
रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला गावात सॅनिटायझर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच प्रत्येक उपकेंद्रावर नागरिकांच्या रॅपिड टेस्ट सुरू आहेत़. सर्दी, ताप, खोकला असल्यास नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी़
डाॅ़. कविता नागरकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, रायपूर