शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक

By admin | Updated: November 8, 2014 23:49 IST

आरोग्य विभाग अनभिज्ञ; खेर्डा येथे१२ जणांना लागण तर सिंदखेडराजा तालुक्यातील पाच जण डेंगू सदृश तापाने दगावले.

जळगाव जामोद (बुलडाणा) : तालुक्यातील ग्राम खेर्डा बु. आणि खेर्डा खुर्द या दोन्ही गावात डेंग्युच्या आजाराची लागण झाली असून, गेल्या १0 ते १५ दिवसांपासून आजारी रुग्ण जळगाव, अकोला आणि खामगाव येथे खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत; मात्र याबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असून, गावात अद्याप कुठलेही पथक अथवा मोठय़ा डॉक्टरांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन्ही गावातील १0 ते १२ रूग्ण सध्या डेंग्यूने ग्रस्त आहेत.डेंग्यूची लागण झालेल्या रूग्णांमध्ये खेर्डा बु. या गावातील जान्हवी प्रमोद भोपळे (वय ७), श्रीजय मधुकर भोपळे (वय ११), परमेश्‍वर सुरेश बंबटकार (वय १५), कपील देवानंद तायडे (वय ९), शुभांगी सारंगधर बोचरे (वय २0) वर्षे या रूग्णांचा तर खेर्डा खुर्द या गावामधील अश्‍विनी प्रभाकर भिसे (वय ११), गजानन दत्तात्रय म्हसाळ (वय ३0), गोपाळ जगदेव वानखडे (वय २७), गणेश हरिदास खिरोडकर (वय ७) इत्यादी रूग्णांचा समावेश आहे. तर याशिवायसुद्धा डेंग्युचा आजार झालेले रूग्ण गावात आहेत. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा याबाबत संबंधित विभागाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. यापैकी बहुतांश रूग्ण हे अकोला येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. *डेंग्यूने सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यूसिंदखेडराजा शहरातील एका सात वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. येथील नसिमखान दुराणी यांच्या महेक या सात वर्षीय चिमुकलीला ताप येत असल्याकारणाने तिला उपचारार्थ औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिन्यापासून महेक हिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही; दरम्यान महेक हिचा डेंग्यू तापामुळे शुक्रवारला मृत्यू झाला. यापूर्वीसुद्धा शहरातील चार जणांचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाला. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.