शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:03 IST

खामगाव: एका होमगार्डला रोजगार हमीच्या कामावर दाखवून अपहार केल्याप्रकरणी हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवांसह चौघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने पोलिसांना दिलेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: एका होमगार्डला रोजगार हमीच्या कामावर दाखवून अपहार केल्याप्रकरणी हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवांसह चौघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खामगावन्यायालयाने पोलिसांना दिलेत. त्यामुळे तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील तत्कालीन सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य  आणि रोजगार सेवकाने संगनमत करून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार विजय सैलानी शिंगाडे (४०) यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी,खामगाव यांच्या न्यायालयात केली. या तक्रारीत महादेव भगवान वानखडे हे होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. या होमगार्डला १ ते ७ एप्रिल २०१२ या कालावधीत हिवरखेड येथे रोहयो मजूर म्हणून त्यांना काम देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ३१ मार्च ते १ एप्रिल २०१२ च्या मध्यरात्रीपर्यंत ते शेगाव येथे रामनवमी उत्सवाच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर होते. त्याचवेळी १३ एप्रिल ते १५ एप्रिल २०१२ या कालावधीत वानखडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये बंदोबस्तासाठी ड्युटी लावण्यात आली. त्याचवेळी ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांना ०८ ते १४ एप्रिलच्या कालावधीत रोहयोच्या कामावर मजुर दाखविण्यात आल्याचे नमूद केले.याशिवाय २०११ ते २०१२ या कालावधीत गावातील अनेक बोगस मजूर रोहयोच्या कामावर लावण्यात आल्याचे नमूद केले. 

 याप्रकरणी सुरूवातीला हिवरखेड पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली.  फिर्यादीच्या तक्रारीत तथ्य असल्याने याप्रकरणी सुनावनी घेतली. त्यानंतर सबळ पुराव्याच्या आधारे शासनाच्या रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचे सिध्द झाल्याने, प्रथमश्रेणी न्यायाधीश व्ही.एम. देवर यांनी हिवरखेडचे तत्कालीन सरपंच मनोहर अर्जून फुंडकर, सदस्य गजानन भगवान वानखडे,  रोजगार सेवक अरविंद त्र्यंबक वाकोडे आणि तत्कालीन सचिव संजय खरत यांच्या विरोधात भादंवि ४२०, ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. विजय शिंगाडे यांच्यावतीने न्यायालयात अ‍ॅड. विरेंद्र झाडोकार यांनी काम पाहीले.

(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCourtन्यायालय