शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 17:12 IST

बुलडाणा :आरोग्य विभागामार्फत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली असून या कालावधीत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ३ लाख ६५ हजार ३९६ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देशहरी भागात १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ ग्रामीण रूग्णालय, ३ दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालय व १ जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत सेवा देण्यात आली.शहरी भागातील एकूण ४१ हजार ८६६, ग्रामीण भागातील ३ लाख २३ हजार ५३० व्यक्तींची तपासणी करण्यात आली

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : मुख स्वास्थ हे सर्व शारिराच्या स्वास्थाचे गणक आहे. त्याचप्रमाणे स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुढील अनेक आजारापासून आपण वाचू शकतो. यासाठी आरोग्य विभागामार्फत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली असून या कालावधीत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ३ लाख ६५ हजार ३९६ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात आली.जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत ग्रामीण भागात व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत शहरी भागात १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मौखिक आरोग्य तपासणी सोबत मौखिक आरोग्य कसे राखावे, कर्करोगास प्रतिबंध, तंबाखूचे दुष्परिणाम व लवकर निदानासाठी तपासणी करण्याबाबत लोकांना माहिती देण्यात आली. या मोहिमेदरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्ह्यातील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ ग्रामीण रूग्णालय तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी नगरपालिकेअंतर्गंत येणाºया ३ दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालय व १ जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत मौखिक आरोग्याबाबत सेवा देण्यात आली.या मोहिमेदरम्यान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ९ डिसेंबर दरम्यान ५५ हजार ३०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, दुसºया आठवड्यात १० ते १६ डिसेंबर दरम्यान १ लाख २२ हजार ९३, तिसºया आठवड्यात १७ ते २३ डिसेंबर दरम्यान ९३ हजार ४०२ व चवथ्या आठवड्यात २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान ९४ हजार ५९३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे शहरी भागातील एकूण ४१ हजार ८६६, ग्रामीण भागातील ३ लाख २३ हजार ५३० व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून ग्रामीण भागात मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.याबाबत करण्यात आली तपासणीजिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या मौखिक आरोग्य तपासणी दरम्यान तोंडात काही त्रास असल्यास, दात दुखणे, तोंडात १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस जखम, व्रण, गाठ असल्यास, अन्न व पाणी गिळतांना त्रास होणे. तोंड उघडता न येणे, कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन करीत असल्यास ३१ वर्षावरील व्यक्तींची तपासणी करण्यात आली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा