शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेच्या ऑनलाईन सभेत विरोधकांचा ऑफलाइन गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:59 IST

Khamgaon Municipal Counsil तांत्रिक मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देनगर पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ऑफलाइन गोंधळ उडाला.तहकूबच्या तांत्रिक चुकीवरून विरोधकांनी सत्ताधाºयांची कोंडी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील विविध विकास कामांना तसेच काही योजनांना मंजुरी देण्यासाठी स्थानिक नगर पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेवरून शुक्रवारी पालिकेत एकच गोंधळ उडाला. स्थगित आणि तहकूब विषयाचा तांत्रिक मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर ऑनलाइन सभेच्या मुद्यावरूनही नगर पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ऑफलाइन गोंधळ उडाला.शिक्षक मतदार संघ निवडणूक आचार संहितेमुळे लांबलेली खामगाव नगर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे आयोजित करण्यात आली. मात्र, स्थगित आणि तहकूबच्या तांत्रिक चुकीवरून विरोधकांनी सत्ताधाºयांची कोंडी केली. मुख्याधिकाऱ्यांकडेही विरोधकांनी ऑनलाइन सभा गैरकायदेशीर असल्याचा मुद्दा रेटून धरला. ऑनलाइन सभा सुरू असतानाच विरोधी नगरसेवक नगराध्यक्षांच्या दालनात पोहोचले. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आतून दरवाजा बंद केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधी सदस्यांनी नगराध्यक्षांच्या दालनाचा दरवाजा बाहेरून बंद केला. विविध कारणांमुळे पालिकेत एकच गोंधळ उडाला. 

कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत ऑनलाइन सभा योग्य होत्या. मात्र, आता सर्वत्र अनलॉक होत असताना ऑनलाइन सभा घेणे अयोग्य आहे. ऑनलाइन तंत्रज्ञानाबाबत अडचणी आहेत. त्यामुळे खामगाव नगर पालिकेने ऑनलाइन सभा टाळायला हव्यात.- ओम शर्मा, भाजप, नगरसेवक.

देशात सर्वत्र अनलॉक प्रक्रीया राबविल्या जात असतानाच, विधानसभा, राज्यसभा सभागृहात ऑफलाइन सभा घेतल्या जात आहेत. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचे कारण पुढे करीत खामगाव नगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून ऑफलाइन घाट घातल्या जात आहे.  - अमेयकुमार सानंदा, गटनेता, काँग्रेस

टॅग्स :khamgaonखामगावPoliticsराजकारण