शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:53 IST

प्रतिदिन ६० नमुन्यांची प्रारंभी या लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे.

बुलडाणा: अनेक अडचणीचा सामना केल्यानंतर अखेर बुलडाण्याची आरटीपीसीआर ल२ब गुरुवारी अधिकृतस्तरावर कार्यान्वीत झाली आहे. दरम्यान, प्रतिदिन ६० नमुन्यांची प्रारंभी या लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. गुरूवारी प्रयोग शाळेत प्रत्यक्ष जिल्ह्यातील संदिग्धांचे अहवाल तपासण्यात आले.विशेष म्हणजे २२ सप्टेंबर रोजी बुलडाण्याच्या या लॅबला ‘आरटीपीसीआर’ने मान्यता दिली होती. सोबतच कोरोनाचे अहवाल तपासण्याची तांत्रिक कुशलताही लॅबमधील तंत्रज्ञांनी अवगत केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी प्रत्यक्ष पहिल्या लॉटमधील नमुनयांची तपासणी करण्यात आली. गेल्या दोन महिन्यापासून बुलडाण्याची आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखरे प्रत्यक्षात आता ही लॅब सुरू झाली आहे.बुलडाण्यात लॅब नसल्यामुळे प्रारंभी येथील संदिग्धांचे नमुने हे अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर तथा वर्धा येथील खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्याला बराच विलंब लागत होता. बऱ्याचदा संदिग्धांचे स्वॅब नमुने हे योग्यरित्या लॅब पर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे संदिग्ध रुग्णांना मानसिक त्रासही सहन करावा लागत होता.मात्र या सर्व पार्श्वभूमीवर बुलडाण्यातील ही लॅब त्वरित कार्यान्वीत व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी युद्द्धपातलीवर प्रयत्न करीत निधी उपलब्ध केला होता. सोबतच प्रस्तावही तातडीने पाठवून प्रत्यक्ष लॅब कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यास अखेर यश आले आहे. दोन नमुनयांची तपासणी केल्यानंतर ते आयसीएमआरकडे पुन्हा तपासणीसाठी पाठविले होते. तसेच बुलडाण्याच्या लॅबचे परीक्षण आयसीएमआरने केल्यानंतर प्रत्यक्षात गुरूवारपासून ही लॅब अधिकृतस्तरावर कार्यान्वीत झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या