शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव येथे ‘श्रीं’च्या प्रकट दिनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:22 IST

शेगाव : श्री संत गजानन महाराजांच्या १४0 वा प्रगटदिनोत्सवास संतनगरीमध्ये माघ वद्य १ गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. श्रींचे मंदीरात प्रगटदिनोत्सवानिमित्त सकाळी १0 वा. ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात व श्री गजानन महाराज संस्थानच्या शिवभक्ताच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महारूद्रस्वाहाकारास योगास आरंभ करण्यात आला. विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांचे हस्ते यावेळी पूजन झाले. 

ठळक मुद्दे१ ते ७ फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : श्री संत गजानन महाराजांच्या १४0 वा प्रगटदिनोत्सवास संतनगरीमध्ये माघ वद्य १ गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. श्रींचे मंदीरात प्रगटदिनोत्सवानिमित्त सकाळी १0 वा. ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात व श्री गजानन महाराज संस्थानच्या शिवभक्ताच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महारूद्रस्वाहाकारास योगास आरंभ करण्यात आला. विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांचे हस्ते यावेळी पूजन झाले. प्रगटदिनोत्सवानिमित्त १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मंदीरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ५ ते ६ काकडा, ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ५.३0 हरीपाठ, रात्री ८ ते १0 किर्तन होत आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून दररोज भजनी दिंड्यांचे आगमन संतनगरीत चालु आहे. श्रींच्या मंदीरात ठिकठिकाणी केळीचे खांब लावण्यात आले आहे. भाविकांची मंदीर परिसरात गर्दी होईल हे लक्षात घेता वन-वे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था संस्थानच्यावतीने करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी श्रींच्या १४0 वा प्रगटदिनी सकाळी १0 ते १२ हजर श्रीरामबुवा ठाकुर यांचे शेगावी ‘श्रींच्या प्रागट्या’ निमित्य किर्तन होईल. तद्नंतर सकाळी १0 वा. यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान होईल. दुपारी २ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्‍वासह नगर परिक्रमा निघेल. ८ फेब्रुवारी मिती माघ वद्य ८ गुरूवारला हभप प्रमोदबुवा राहणे मु. पळशी यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तन होईल. 

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर