शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा आठ जूनपासून ; राज्यात ७३६ परीक्षा केंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 16:50 IST

बुलडाणा : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ मे पासून सुरु आहेत. मात्र २८ मे रोजी पालघर, भंडार-गोंदिया या मतदार संघातील लोकसभा पोटनिवडणुकीमुळे  त्या दिवशीची परीक्षा रद्द झाली होती. त्यातील बी.ए., एमबीए, बी.कॉम  वृत्तपत्रविद्या, या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आठ जूनपासून घेण्यात येत आहे.

ठळक मुद्दे २८ मे रोजी महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया या मतदार संघात लोकसभा पोटनिवडणूकीमूळे पेपर रद्द करण्यात आला होता.  यात वृत्तपत्रविद्या या अभ्यासक्रमाचा पेपर जून मे रोजी घेण्यात येणार आहे. बीबीए अभ्यासक्रमाचा पेपर १४ जून रोजी घेण्यात येणार आहे. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ मे पासून सुरु आहेत. मात्र २८ मे रोजी पालघर, भंडार-गोंदिया या मतदार संघातील लोकसभा पोटनिवडणुकीमुळे  त्या दिवशीची परीक्षा रद्द झाली होती. त्यातील बी.ए., एमबीए, बी.कॉम  वृत्तपत्रविद्या, या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आठ जूनपासून घेण्यात येत आहे.शिक्षणापासून वंचित असलेल्या व्यक्तींसाठी दूरशिक्षण ही एक चांगली संधी असून, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे अनेकांना ही संधी  उपलब्ध आहे. नियमित वर्गात न जाता आपली नोकरी सांभाळून आणि आपल्या सोईच्या वेळेत अभ्यास करून आज लाखो विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण  करत आहेत.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे सत्रातील परीक्षांना २५ मेपासून प्रारंभ झाला असून, राज्यातील ७३६ परीक्षा केंद्रांवर विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम व सत्रनिहाय परीक्षा सुरू आहेत. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, पुणे, मुंबई व नाशिक या आठ विभागीय केंद्रांवर ह्या परीक्षा होत आहे. दरम्यान,  २८ मे रोजी महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया या मतदार संघात लोकसभा पोटनिवडणूकीमूळे पेपर रद्द करण्यात आला होता.  रद्द झालेला हा पेपर ज्या अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर संपेल त्याच्या दुसºया दिवशी लगेचच घेतला जाणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली होती. मात्र त्या पेपरचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात आले. यातील काही अभ्यासक्रमांचे रद्द झालेले पेपर घेण्यात आले असून बी.ए., एमबीए, बी.कॉम  वृत्तपत्रविद्या, या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आठ जूनपासून घेण्यात येत आहे. यात वृत्तपत्रविद्या या अभ्यासक्रमाचा पेपर जून मे रोजी घेण्यात येणार आहे. एमबीए अभ्यासक्रमाचा पेपर ११जून, बी.ए. आणि बीकॉम या अभ्यासक्रमाचा पेपर १३ जून रोजी होणार आहे. बीबीए अभ्यासक्रमाचा पेपर १४ जून रोजी घेण्यात येणार आहे.  ५ लाख ८३ हजार परीक्षार्थीराज्यातील ७२६ परीक्षा केंद्रांवरून सुमारे ६ लाख ४५ हजार १५७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बी.ए. बीकॉम, बीएस्सी, बी-लिब, वृत्तपत्रविद्या, कृषी, वाणिज्य, व्यवस्थापन, संगणकशास्त्र, आरोग्य आदी विविध ९६ अभ्यासक्रमांच्या १ हजार २३ विविध विषयांच्या परीक्षा सुरू आहेत. सुमारे ५ लाख ८३ हजार ७३० परीक्षार्थीचा समावेश आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षा