शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्ह्यात अवघे तीन टक्केच पीक कर्ज वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:35 IST

एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ असताना प्रत्यक्षात ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थात अवघे तीन टक्केच पीक कर्ज बँकांनी वाटप केलेले आहे.

ठळक मुद्देजिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. बँकेने २० कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे. बँकांनी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच पीक कर्ज वाटपाची गती तुलनेने संथ असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून दुष्काळाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती मशागतीसह, पेरणीसाठीचे बि-बियाणे खरेदीसाठी सध्या पैशाची गरज आहे. त्यानुषंगाने विचार करता एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ असताना प्रत्यक्षात ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे अर्थात अवघे तीन टक्केच पीक कर्ज बँकांनी वाटप केलेले आहे.त्यामुळे पीक कर्जाचा वेग वाढविण्याची गरज प्रतिपादीत होत आहे. दुसरीकडे पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासोबतच दर पंधरवाड्याला लीड बँकेकडून पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास सव्वातीन लाख शेतकºयांना यंदा पीक कर्ज वाटपाचे जिल्ह्यातील व्यापारी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकेला उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची दोलायमान स्थिती पाहता या बँकेवर तुलनेने कमी बोजा टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मदार ही राष्ट्रीय बँकावरच राहणार आहे.जिल्ह्यात खासगी बँकांना २४० कोटी ८८ लाख रुपयांचे उदिष्ठ देण्यात आले आहे. त्यापैकी या बँकांनी आतापर्यंत ७०८ शेतकºयांना ११ कोटी ५० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या एकूण उदिष्ठाच्या ते जवळपास पाच टक्के आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला २८१ कोटींचे उदिष्ट असून त्यांनी प्रत्यक्षात ४४१ शेतकºयांना तीन कोटी ९३ लाख ४२ हजार रुपयांचे पीक कर्ज दिले आहे. बँकेला मिळालेल्या उदिष्टाच्या ते अवघे दीड टक्का ही नाही.जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी एक हजार ३११ शेतकºयांना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने २० कोटी ७९ लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एक हजार २०४ कोटींचे पीक कर्जाचे उदिष्ट दिलेले आहे. मात्र या बँकांचा पीक कर्ज वाटपाचा वेग हा अत्यंत धिमा आहे. आतापर्यंत या बँकांनी एक हजार ७०२ शेतकºयांना उदिष्टाच्या १.१० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. जवळपास १३ कोटी २५ लाखांच्या घरात ही रक्कम जाते.प्रत्यक्षात जिल्हयातील बँकांनी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.दुसरीकडे गेल्या खरीपात शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. पावसाने ओढ दिल्याने शेतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले. बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये २०१८ च्या तुलनेत ५०० कोटी रुपयांची आवक घटली आहे. परिणामी शेतकºयांच्या हातातील पैसाही तुलनेने घटला आहे. त्यातच शेतकरी कर्जमाफीचेही त्रांगडे कायम आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर समस्या आहेत. दुष्काळी स्थिती पाहता जवळपास ५६० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे यंदा पूनर्गठन करावे लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक