शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विमा असेल तरच महामार्गाने जा... सोशल मीडियावर संदेश व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:44 IST

National Highway, Khamgaon to Malkapur मलकापूर ते खामगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे आहेत.

 - सुहास वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नांदुरा : खामगाव ते मलकापूर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेबाबत सोशल मीडियावर अनेक संदेश व्हायरल होत आहेत. त्यामध्ये  'विमा काढला असेल तरच राष्ट्रीय महामार्गाने जा', डॉक्टरची अपॉइंटमेंट पहिलेच घ्या, नंतरच महामार्गाने जा, असे टीकात्मक मेसेज व्हायरल होत आहेत. यावरून या महामार्गाच्या दुर्दशेबद्दल नागरिक दिवसेंदिवस संतप्त होत असल्याचे दिसत आहे. मलकापूर ते खामगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होण्यासोबतच वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.  विशेष म्हणजे, लोकमतने याविषयी वृत्त प्रकाशित केल्यानंतर खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ती बुजविण्यात आली. मात्र परतीच्या पावसामुळे त्या खड्डयामधील मुरूम वाहून गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडले. तेव्हापासून या रस्त्याच्या दुर्दशेला प्रारंभ झाला.  खड्ड्यांमधे दुरुस्तीच्या नावाखाली केवळ चुरी टाकली जाते जी वाहनधारकांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे.रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. अपघातात झाली आहे वाढ 

दोन दिवसाआधीच चांदुर बिस्वा येथील जयेश संजय भागवत हे वडनेर जवळ चुरी टाकलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकीवरुन पडले. सोबत असलेली त्यांची आई  रोडवर फेकल्या गेली. यावेळी त्यांच्या जवळूनच कंटेनर भरधाव गेला. अपघातात त्यांना जबर दुखापत झाली. तर याच खड्डयांमुळे नायगाव येथील संजय इंगळे यांच्या एकुलता एक तरूण मुलाचा अपघातात मृत्यू झाला.        

टॅग्स :khamgaonखामगावNanduraनांदूराNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6