शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती अद्याप दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 09:55 IST

Buldhana News : जिल्ह्यातील जवळपास ८,२६३ फेरीवाल्यांना अद्याप या मदतीची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढत्या कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांना दीड हजार रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ८,२६३ फेरीवाल्यांना अद्याप या मदतीची प्रतीक्षा आहे. त्यांच्या हाती अद्याप दमडीही पडलेली नाही.संचारबंदीमध्ये कौटुंबिक अर्थकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४४६ कोटी रुपयांच्या पॅकेजअंतर्गत जिल्ह्यातील ८,२६३ फेरिवाल्यांना १ कोटी २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांची मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, अग्रणी बँक, पालिका प्रशासन विभागाकडे यासंदर्भातील नेमकी माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पालिकास्तरावरच हा विषय हाताळल्या जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी किती जणांना ही मदत मिळाली, हेही स्पष्ट होत नाही. परिणामी ‘नुसताच घोषणांचाच बाजार, फेरीवाल्यांच्या हाती दमडीही नाही’ अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी मिशन बिगीन अंतर्गत जिल्ह्यातील ८,२६३ पैकी ५,७०० फेरीवाल्यांना ५७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यामुळे बँकांकडे फेरीवाल्यांचा अद्ययावत डाटा उपलब्ध आहे. मात्र, फेरीवाले अद्यापही मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.

अशी आहे फिरवाल्यांची संख्याबुलडाणा तालुक्यात १,१७८, चिखली १,१३८, देऊळगाव राजा २९९, सि. राजा १२७, मेहकर ३५६, लोणार २५६, संग्रामपूर ४०, शेगाव ८७४, खामगाव १०१५, नांदुरा ११८८, मलकापूर १२६८, जळगाव जामोद ४४३, मोताळा ८१ याप्रमाणे जिल्ह्यात फेरीवाल्यांची संख्या आहे. केंद्राच्या आत्मनिर्भर पॅकेजच्या वेळी या फेरीवाल्यांनी मदतीसाठी अर्ज केले होते. दरम्यान या ८ हजार २६३ फेरीवाल्यांपैकी ५ हजार ७०० जणांना आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत यापुर्वी ५७ कोटी रुपये कर्ज दिले आहे.

पायडल रिक्षाचालकांची माहिती पाठवलीराज्य शासनाने पॅकेज जाहीर केल्यानंतर बुलडाणा पालिकेने शहरात पायडल रिक्षा चालवीत असलेल्यांची माहिती संकलीत केली. त्यात अद्यापही शहरात सहा जण पायडल रिक्षा चालवत असल्याचे समोर आले. त्यांची माहिती पालिकेने नगर विकास विभागाकडे पाठविली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पालिका प्रशासनाकडेही उपलब्ध नाही माहितीजिल्ह्यातील पालिकांवर नियंत्रण ठेवून असलेल्या पालिका प्रशासन विभागाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडेही अनुषंगिक माहिती उपलब्ध नसल्याचे पालिका प्रशासन अधिकारी मनोहर अकोटकर यांनी सांगितले. बुलडाणा पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे हेही संपर्क कक्षेच्या बाहेर होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा