शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणात केवळ ३१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 10:41 IST

Only 31% water storage in Wan Dam : हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर :  अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे. यंदा पावसाळा सुरू होऊन तीन आठवड्याच्या वर कालावधी निघून गेला, तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. आतापर्यंत धरण क्षेत्रात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २९ जून, २०२० रोजी धरणात तब्बल ४१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणातील जलसाठ्यात १० टक्क्यांनी घट झाली. लवकर धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपाणपट्ट्यातील संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्या जलसाठ्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात लवकर समाधानकारक पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यात कपातीची वेळ येऊ शकते. वान नदी पात्रात उभारण्यात आलेल्या हनुमान सागर धरणावर शेकडो गावांतील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे. या धरणावर वीजनिर्मिती संच कार्यान्वित असून, त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलोवॅट आहे. दरवर्षी १ किलोवॅट वीजनिर्मिती येथे करण्यात येते. या वर्षी मात्र धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने वीजनिर्मिती संच बंदच आहे. मध्य प्रदेशातून उगम असलेली वान नदी सातपुडा पर्वत रांगेतून येत असल्याने, या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पाऊस पडल्यास, या धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते. पावसाळा सुरू होऊन बराच कालावधी उलटून गेला,  पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणात पाण्याची आवक घटत आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पSangrampurसंग्रामपूरTelharaतेल्हारा