शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढीनंतर १४ टक्के शेतकऱ्यांनीच काढला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 12:24 IST

Crop insurance : जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला.

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप पीक विम्यासाठी जवळपास नऊ दिवसांची मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. मात्र, गेल्या वर्षी विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना करता केवळ ३८ टक्केच शेतकऱ्यांनी विमा काढल्यचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ८७ हजार ८४८ आहे. यापैकी साधारणत: दरवर्षी ५० टक्के शेतकरी विमा काढतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गासोबतच प्रशासकीय यंत्रणेमधील दिरंगाई, असा दुहेरी फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठा फटका दिला आहे. २०१९ मध्ये वार्षिक सरासरीच्या २२ टक्के परतीचा पाऊस झाला होता. गेल्या वर्षीही अशीच स्थिती होती. त्यामुळे नेमके उत्पादन हाती येण्याच्या काळातच शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्या तुलनेत विमा कंपन्या व प्रशासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने नुकसान होऊनही पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असल्याचा गत दोन वर्षांतील अनुभव आहे. त्यामुळे पीक विम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा