शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

विज्ञान किटसाठी १८ जिल्ह्यात ऑनलाइन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 22:15 IST

किटद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाच प्रशिक्षणाचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी होत आहे.

खामगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील १८ जिल्हा परिषदांच्या उच्च प्राथमिक शाळांना विज्ञान किटचा पुरवठा केला आहे. त्या किटद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाच प्रशिक्षणाचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यामध्ये संबंधित शाळांच्या गणित व विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाने एनसीइआरटीमार्फत विज्ञान किटचा पुरवठा केला आहे. उच्च प्राथमिक शाळेसाठी दिलेल्या या किटमध्ये मायक्रोस्कोपही आहे. राज्याच्या १८ जिल्हा परिषदांमध्ये ज्या शाळांना या किटचा पुरवठा झाला आहे. त्या शाळांतील शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केला आहे. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता संबंधित शिक्षकांना ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रशिक्षणात किटचा शैक्षणिक वापर कसा करावा, यासाठी आॅनलाइन वेबिनार होणार ाहे. त्यामध्ये संबंधित उच्च प्राथमिक शाळेतील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना सहभागी व्हावे लागणार आहे. त्यासाठी सर्वच जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या. या किटच्या वापराचे प्रशिक्षण अहमदाबाद येथील खासगी संस्थेद्वारे दिले जात आहे.

 या जिल्ह्यात झाला किट पुरवठाकेंद्र शासनाने किट पुरवठा केलेले राज्यात १८ जिल्हा परिषदा आहेत. त्यामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेडचा समावेश आहे.

टॅग्स :khamgaonखामगावscienceविज्ञान