शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीतील व्यापाऱ्याची तीन लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 11:56 IST

Cyber Crime : चिखली येथील व्यापारी बिपीन पोपट हे मोबाईल बँकींगद्वारे त्यांचे व्यवहार करत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: येथील एका व्यापाऱ्याची सुमारे तीन लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी उघडकीस आली असून या प्रकरणी चिखली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.चिखली येथील व्यापारी बिपीन पोपट हे मोबाईल बँकींगद्वारे त्यांचे व्यवहार करत होते. दरम्यान ३० जून रोजी त्यांना ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी गुगलवर त्यांच्या स्टेट बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च केला होता. त्यावेळी बँकिंग सर्व्हीस नावाने त्यांना एका क्रमांकावर वारंवार फोन येऊ लागले होते. संबंधित व्यक्ती त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील मागत होता. मात्र त्यांनी त्यास खात्याचा तपशील दिला नाही. दोन ते तीन वेळा असा प्रकार घडला.दरम्यान, ७ जुलै रोजी त्यांना पुन्हा संबंधित मोबाईल क्रमांकावरून फोन आला व तुमच्या खात्यातून कोणीतरी पैसे कात आहे. त्यामुळे तुमचा आधार कार्ड व पॅनकार्ड नंबर द्या. आपले खाते मी ब्लॉक करतो असे सांगितले. त्यामुळे बिपीन पोपट यांनी संबंधिताला तपशील दिला. दरम्यान त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यातून एकदा १ लाख ४९ हजार ६७६ रुपये व दुसऱ्यांचा १ लाख ५० हजार रुपये असे २ लाख ९९ हजार ६७६ रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणी त्यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलिस तपास करत आहे. 

टॅग्स :Chikhliचिखलीcyber crimeसायबर क्राइम