शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी 'एक गाव एक बालरक्षक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:15 IST

स्थलांतरीत होणाऱ्या बालकांना शाळांत दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने गाव तेथे बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली आहे.

खामगाव : कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत होणाऱ्या बालकांना शाळांत दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने गाव तेथे बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात बालरक्षक नेमण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने उपक्रम सुरू केला आहे.कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातून व बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक परतले आहेत. त्यांच्यासोबत असलेली ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालके शाळाबाह्य असण्याची शक्यता आहे. प्रत्येक मुल शाळेत गेलेच पाहिजे, यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ३ आॅगस्ट रोजी संवाद साधून राज्यातील बालरक्षक चळवळीतील समोरील आव्हाने, पुढील दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे कुटुंबे स्थलांतरीत होत आहेत. त्यामध्ये इतर जिल्ह्यातून राज्यातून येणारे व जिल्ह्यातून दुसरा जिल्ह्यात व दुसºया राज्यात जाणारे कुटुंब आहेत. या कुटुंबासोबत ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ही बालके शाळाबाह्य तर नाही ना, याचा शोध शिक्षण विभाग घेत आहे. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाकडून कार्यवाही केली जाणार आहे. प्रत्येक शिक्षक बालरक्षक आहे. प्रत्येकाने प्रभावी अंमलबजावणीकरीता प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात एक बालक रक्षक नेमावा अशा सूचना आहेत.

प्रत्येक गावात  बालरक्षकाची नियुक्तीनिस्वार्थपणे बालरक्षक म्हणून काम करण्याची तळमळ आहे, त्यांना बालरक्षक म्हणून नेमावे. बालरक्षक कुणालाही बनविता येऊ शकते. बालरक्षकांवर संपूर्ण गावातील शाळाबाह्य बालकांची जबाबदारी राहील. आवश्यकतेनुसार बालरक्षक शिक्षकांचे सहकार्य घेतील. बालरक्षकाचे नाव शाळेच्या दर्शनी भागावर व ग्रामपंचायतच्या दर्शनी भागावर लावावे असेही सांगण्यात आले आहे. बालकांचे पोषण, रक्षण व शिक्षण या तीन गोष्टींवर बालरक्षकांनी काम करावे असेही ठरविण्यात आले आहे.

स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्नविद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक आरोग्य, भाविनक व सामाजिक संतुलन, मूलभूत क्षमता या बाबींवर बालरक्षकांनी लक्ष द्यावे, सध्या आॅनलाइन शिक्षण सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल नाही त्यांच्यापर्यंत शिक्षकांच्या सहकार्याने बालरक्षकांनी पोहोचावे. स्थलांतरामुळे मुलांच्या शाळा बदलतात, त्यामुळे स्थलांतर थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र