शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार किमी रस्ते होणार खड्डेमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:35 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील बुलडाणा सार्वजनिक बांधकाम  विभागांतर्गत येत असलेल्या दीड हजार किलोमीटर लांबीच्या रस् त्यांपैकी १३00 किमी लांबीचे रस्ते खड्डेमुक्त तथा अन्य दुरुस् तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

ठळक मुद्देबुलडाणा विभागाला २६ कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील बुलडाणा सार्वजनिक बांधकाम  विभागांतर्गत येत असलेल्या दीड हजार किलोमीटर लांबीच्या रस् त्यांपैकी १३00 किमी लांबीचे रस्ते खड्डेमुक्त तथा अन्य दुरुस् तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी २५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून  देण्यात आला असून, त्यांतर्गत १३00 किलोमीटर लांबीच्या रस् त्यावरील खड्डे भरणे, विशेष दुरुस्ती, गटार दुरुस्ती ही कामे केली  जाणार आहेत. प्रमुख राज्य मार्गाची बुलडाणा विभागांतर्गत ४१२,  राज्य महामार्गाची ३३३ किमी आणि प्रमुख जिल्हा मार्गाची ६0९  किमी  लांबी आहे. १५ डिसेंबर पूर्वी राज्यातील सार्वजनिक  बांधकाम विभागांतर्गतचे रस्ते खड्डेमुक्त करण्याचे ना. चंद्रकां तदादा पाटील  यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यानुषंगाने  बुलडाणा विभागात अनुषंगिक कारवाई सुरू झाली आहे.रस्ते दुरुस्तीची गटपद्धती बंदयापूर्वी योजनेत्तर अनुदानातून रस्ते दुरुस्ती केली जात होती. यात  खड्डे भरणे, विशेष दुरुस्ती, पूल दुरुस्ती, रस्ते सुरक्षा आणि पूर  हाणीमुळे खराब झालेल्या रस्त्यांचे गट अ ते गट फ पर्यंत  वर्गीकरण केले जात होते. त्यानंतर त्यांची दुरुस्ती केली जात हो ती; परंतु आता ही गट पद्धतीच बंद करण्यात आली आहे. खड्डे  दुरुस्तीचा समावेश पूर्वी गट अ मध्ये होता आणि त्याला थेट  कार्यकारी अभियंत्याच्या मंजुरीची गरज लागत होती. 

आता दोन वर्षाचा टप्पारस्ते दुरुस्तीच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला असून, दोन  वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराला याची जबाबदारी सो पविण्यात येणार आहे. त्यासाठी किमान दहा किलोमीटर लांबीच्या  रस्त्याचा निकष ठेवण्यात आला असून, थेट ई -टेंडरींगद्वारेच ही  रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे. कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे  पैसेही टप्प्या टप्प्याने दिले जाणार असून, यांतर्गत बुलडाणा  जिल्ह्यात १३00 किमी लांबीच्या रस्त्यांसाठी ५८ कामे मंजूर  करण्यात आली आहे.

हस्तांतरित रस्ते अडचणीचे!बुलडाणा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्हा परिषदेच्या  अखत्यारीत असलेले जवळपास ५00 किमीचे रस्ते हस्तांतरीत  झाले आहेत. या रस्त्यांची एकंदरी खस्ता हालत पाहता बांधकाम  विभागासमोरही खड्डे मुक्तीचे आव्हान उभे ठाकले आहे. या रस् त्यांचा दर्जा अपेक्षित अशा आयआरसीच्या निकषात बसणारा  नसल्याचे चित्र आहे.