लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा: येथील सेवानवृत्त मुख्याध्यापक त्र्यंबक मगर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्राचे संचालक किरण मगर यांचे बंधू अरुण मगर (४८) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. उपरोक्त घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. अरुण मगर आणि त्यांची पत्नी हे शेतात कामासाठी गेले होते. महिलांना सोबत घेऊन काम करीत असताना अरुण सोबत नेलेला दोर घेऊन अंब्याच्या झाडावर गेले. तेवढय़ात काही महिलांची नजर त्यांच्यावर पडली. पत्नीसह महिलांनी त्यांना आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही अरुणने गळ्यात दोर अटकवून उडी घेतली. मानेला झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वांंच्या समोर अरुणने आत्महत्या केल्यामुळे शेतात एकच अक्रोश झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले; परंतु त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या मागे २ मुली, २ मुले, आई, वडील, नातवंडे, भाऊ, पत्नी असा मोठा आप्त परिवार आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:38 IST
लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा: येथील सेवानवृत्त मुख्याध्यापक त्र्यंबक मगर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्राचे संचालक किरण मगर यांचे बंधू अरुण मगर (४८) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. उपरोक्त घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. अरुण मगर आणि त्यांची पत्नी हे शेतात कामासाठी गेले होते. महिलांना सोबत ...
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
ठळक मुद्दे शेतात गळफास घेऊन केली आत्महत्या घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली