शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुक्यातील मढ येथे पूर्व वैमनस्यातून एकाचा खून; पाच संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:34 IST

धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता.

ठळक मुद्देमराठवाड्याच्या सीमेलगतची घटनाश्‍वान पथकाने काढला माग!

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात खोदण्यात आलेल्या गड्डय़ात मृतदेह पुरण्यात आला होता.धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या मढ येथील विजय पुनीलाल चांदा (३६) हे १३ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते; मात्र नातेवाइकांनी १४ जानेवारी रोजी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. दरम्यान, विजय चांदा यांचा भाऊ राजू पुनीलाल चांदा यांनी १५ जानेवारी रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार धाड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून बेपत्ता व्यक्तीच्या  कुटुंबियांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, मढ येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळच्या रस्त्यावर संशयास्पद स्थितीत रक्ताचे डाग  आणि विजय चांदा यांची चप्पल दिसल्यामुळे बेपत्ता इसमाच्या नातेवाइकांनी  पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी श्‍वान पथकास पाचारण केले असता, श्‍वानाने रक्ताचे डाग असलेल्या रस्त्यावर २ कि.मी. अंतरावरील चिचतळ्य़ानजीक एका खड्डय़ाजवळ पोलिसांना नेऊन पोहोचवले. त्या खड्डय़ात बेपत्ता असलेल्या विजय चांदा याचा खून करून त्यांचे पार्थिव गाडण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुषंगाने नंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत विजय चांदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून विजय चांदा यांचा  पूर्व वैमनस्यातून ईश्‍वर रामचंद्र बालोद, त्याची तीन मुले दिवान बालोद, महिपाल बालोद, गोपाल बालोद आणि विजय नारायण बालोद यांनी खून केल्याचा संशय व्यक्त करीत पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली धाडचे ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस कर्मचारी गजानन मुंडे आणि सहकारी करीत आहेत.

२0१५ मध्ये झाला होता वादसाधारणपणे २0१५ मध्ये मृत विजय चांदा याच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी महीपाल बालोद व इतरांवर युवतीची छेड काढण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला होता. तर याच घटनेत महीपाल बालोद याच्या तक्रारीवरून विजय चांदा व इतरांवर गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल केले गेले होते. हे प्रकरण तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान, याचाच राग मनात धरून विजय चांदाचा खून झाल्याचा संशय मृत विजयच्या नोतवाइकांनी दिली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना बुलडाणा येथे वैद्यकीय तपासणीसाठी सायंकाळी आणण्यात आले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाMurderखून