शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर-औरंगाबाद मार्गावर खासगी बस व ट्रक अपघातात एक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:09 IST

ट्रक आणि खासगी प्रवासी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनी खुर्द: मेहकर-औरंगाबाद मार्गावर अंजनी खुर्द गावानजीक ट्रक आणि खासगी प्रवासी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात नऊ आॅगस्ट रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास झाला.अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मुदसिर अहमदर खान (३२, रा. आमकिन्ही, ता. मानोरा, जि. वाशिम) असे आहे. गंभीर जखमीमध्ये खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा चालक अश्विन जाने आणि ट्रक चालक जुनेद आलम यांचा समावेश आहे. मेहकर-औरंगाबाद मार्गावर यवतमाळकडून औरंगाबादकडे जाणाºया एमएच-२९-एडब्ल्यू-१११ आणि पुणे येथून नागपूरकडे जाणारा ट्रक युपी-७७-एन-८२२५ यांची अंजनी बुद्रूकनजीक एका ढाब्याजवळ समोरा समोर धडक होऊन हा अपघात झाला होता.

रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसमध्ये २७ प्रवाशी होते. दरम्यान पहाटेची वेळ असल्याने वाहनांचा वेगही अधिक होता. त्यामुळे दोन्ही चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा कयास व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. अपघातातील मृत व्यक्तीचे पार्थिव हे मेहकर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते तर अन्य दोन गंभीर जखमींवर मेहकर येथीलच ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.(वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात