शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चार वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 22:02 IST

Accident News ही घटना खामगाव-चिखली रस्त्यावरील माथनी फाट्यावर रात्री ८:३० वाजता दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गावातील पोच रस्त्यावरून भरधाव महामार्गावर अचानक आलेल्या वाहनामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला. ही घटना खामगाव-चिखली रस्त्यावरील माथनी फाट्यावर रात्री ८:३० वाजता दरम्यान घडली.  माथनी फाट्यावरील अंतर्गत रस्त्यावर एक मालवाहू वाहन भरधाव वेगात अचानक मुख्य रस्त्यावर आले. अचानक आलेल्या वाहनामुळे चिखलीकडे जाणारी बस या वाहनावर आदळली. त्यापाठोपाठ आणखी एक प्रवासी जीपगाडी आणि आॅटोही समोरील वाहनांवर धडकला. यात मालवाहू मिनीट्रक वाहनांतील एक २० वर्षीय युवक जागीच ठार झाला. तर उर्वरीत वाहनांमधील सुमारे सात जण जखमी झालेत. यातील दोन जखमींना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले असून, सहा जणांवर खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातील काही जखमी परस्पर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे या उपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  या घटनेत सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथील गजानन विश्वनाथ गाढवे(२०) या युवकाचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला. तर विजय रायसिंग पवार(४०) रा. पातुर्डा, सुनिल नागोराव डोंगरे (३६) रा.बोरगाव वैराळे,  पुरूषोत्तम भास्कर चेके (५०) रा. लिंगा, बापुराव महादेव मानवतकर (५५) रा. लिंगा, देवानंद रामदास चेके (१५) रा.लिंगा, ज्ञानेश्वर सदाशिव चेके (३०) रा.लिंगा, चेविन विश्वनाथ पवार (२८) दधम, सविता विनोद इंगळे (१८) रा. बुलडाणा जखमी झालेत. यातील दोन गंभीर जखमींना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले. त्याचवेळी  संगीता इंगळे, विश्वनाथ चेके, कविता देशमुख, अर्जुन देशमुख, सुनिल डाबर, भावना देशमुख, प्रशांत भालेराव, डिगांबर चेके, महादेव धनोकार, रतन चव्हाण आदी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक आणि शहर पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

 -शेतकºयांवर काळाचा घाला!गुरूवारी खामगावचा बाजार असल्यामुळे लिंगा येथील काही शेतकरी खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आले होते. शेतमाल विक्री केल्यानंतर परत गावी परतत असतानाच माथनी फाट्यावर अपघात झाल्याचे समजते. यात एका युवा शेतकºयाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात