शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक ठार,९ जखमी

By admin | Updated: April 20, 2015 01:58 IST

खामगाव मेहकर तालुक्यात तीन अपघात.

खामगाव : वेगवेगळ्या तीन अपघातात १ जण ठार, तर ९ जण जखमी झाले. या घटना १८ व १९ एप्रिल रोजी घडल्या. मेहकर-जानेफळ रोडवरील फर्दापूरनजीक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जब्बर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार जागेवर ठार झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी रात्री ८.३0 वाजता घडली. खामगाव येथील उमेश विष्णूसिंग फुलारे (२८) हे एम.एच.२८ ई. २३९४ क्रमांकाच्या मोटारसायकलने जानेफळवरून मेहकरकडे येत होते. दरम्यान, फर्दापूरनजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार उमेश फुलारे हे जागेवरच ठार झाले. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुसर्‍या घटनेत भरधाव ट्रक मॅजिकला धडक देऊन उलटला. यामध्ये मॅजिकचा चालक जखमी झाला. ही घटना १९ एप्रिल रोजी खामगाव ते नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावर खामगावनजीक घडली. चिंचखेड नाथ ता. खामगाव येथील मजूर पिंप्री देशमुख परिसरातील मुकुंद यांच्या खदानवर कामाला आहेत. या मजुरांना चिंचखेड नाथ येथील मॅजिक वाहनचालक आपल्या वाहन क्रमांक एम.एच.२८ व्ही ६१७८ ने सोडून चिंचखेड नाथ येथे परत जात होता. दरम्यान, समोरून भरधाव येणार्‍या हैद्राबाद येथून दिल्ली येथे मोसंबी घेऊन जाणार्‍या ट्रक क्रमांक एचआर ५५ के २६३५ च्या चालकाने मॅजीक वाहनाला धडक दिली. यामध्ये मॅजिक चालक दिलीप धोती रा. चिंचखेड नाथ हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जलंब पो.स्टे.चे पोहेकाँ शाम पवार, पोकाँ संतोष डाकोर, उमेश सिरसाट आदींनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हय़ाची नोंद करून जलंब पो.स्टे.ला गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.