शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ट्रकची मिनी ट्रकला धडक, एक ठार, १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:40 IST

बुलडाणा : चिखली येथून औरंगाबादकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रकला देऊळगावराजाकडून येत असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या ...

बुलडाणा : चिखली येथून औरंगाबादकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रकला देऊळगावराजाकडून येत असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये १५ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात २८ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंढेरा फाट्यानजीक घडला. दरम्यान, या अपघातातील जखमींना प्रथम देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून तिघांना जालना तर सातजणांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मिनी ट्रक (एमएच २० बी ५६२१) हा मजुरांच्या कुटुंबांना घेऊन औरंगाबादकडे जात होता. अंढेरा फाट्यानजीक (एमपी ०९ एचएच ११५२) या ट्रकची मिनी ट्रकला जबर धडक बसली. त्यामध्ये औरंगाबाद येथील अविनाश तुंबरे अवघडनाथ (रा. माळीवाडा) हा जागीच ठार झाला तर अन्य १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रथमोपचार करून तीन गंभीर जखमींना जालना येथे तर अन्य सातजणांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुलडाणा येथे उपचारासाठी दाखल केलेल्यांमध्ये वीना अवघडराव कुमरे, निहू अवघडराव कुमरे, गीता रामनाथ कुमरे, राखी अजय कुमरे, मैना रंगनाथ कुमरे, अजय जगन्नाथ कुमरे, रुपा रंगनाथ कुमरे (सर्व रा. माळीवाडा, औरंगाबाद) यांचा समावेश आहे.