शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एकाने केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:44 IST

Buldhana News : उपोषण पोलिसांनी कथितस्तरावर दमदाटी करून मागे घेण्यास भाग पाडल्यामुळे एकाने विषारी अैाषध प्राशन केल्याची घटना ८ जून रोजी सकाळी अमडापूर येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भाऊबंदकीतील वादानंतर पोलिसांनी योग्य न्याय न देता मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अमडापूर पोलिस ठाण्यासमोर ७ जून रोजी सुरू केलेले उपोषण पोलिसांनी कथितस्तरावर दमदाटी करून मागे घेण्यास भाग पाडल्यामुळे एकाने विषारी अैाषध प्राशन केल्याची घटना ८ जून रोजी सकाळी अमडापूर येथे घडली. दरम्यान या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केले आहे.अमडापूर येथील श्याम राऊत व त्यांचे भाऊ गजानन राऊत यांचा त्यांच्या भाऊबंधांशी मार्च महिन्यात वाद झाला होता. याप्रकरणात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात श्याम राऊत यास अमडापूर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी श्याम राऊत यांनी ७ जून रोजी सायंकाळी अमडापूर पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान हे उपोषण ठाणेदार अमित वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दमदाटी करून मोडीत काढल्याचा आरोप विषय प्राशन करणाऱ्या श्याम राऊत यांचे भाऊ गजानन राऊत केले आहे. सध्या श्याम राऊतवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

दोन पोलिसांना कारणे दाखवा नोटीसमार्च महिन्यातील या घटनेप्रकरणी एसडीपीओ रमेश बरकते यांनी चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे बिट बदललेले आहेत. सोबतच संबंधितांना त्यांची एक वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आहे. 

ठाणेदारांची बदलीअमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे यांची बुलडाणा येथे जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांनी बदली करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरियांनी दिली. दरम्यान, त्यांच्या जागी अमडापूरचा प्रभारी पदभार एलसीबीचे एपीआय नागेशकुमार चतरकर यांच्याकडे देण्यात आला असल्याची माहिती आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस