शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:22 IST

बुलडाणा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ मार्च रोजी हा निकाल दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ मार्च रोजी हा निकाल दिला.तालुक्यातील खुपगाव येथील नीलेश उर्फ समाधान गायकवाड हा पत्नी यशोदाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. त्यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. दरम्यान १९ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी याच कारणावरुन पती- पत्नीमध्ये भांडण झाले. त्यामुळे नीलेशने पत्नीस लोखंडी पाईपने मारहाण करुन घटनास्थळावरुन पळ काढला. डोक्याला मार लागल्याने यशोदा गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी जखमीस येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार केल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अकोला हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच यशोदाचा मृत्यू झाला.खुपगावचे पोलिस पोटील विदूर तुपकर यांनी या घटनेची तक्रार बुलडाणा ग्रामिण पोलिस ठाण्याला दिली होती. तत्कालीन ठाणेदार अमित वानखेडे यांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले होते. वादी पक्षाच्यावतीने वतीने प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. व्ही. एस. भटकर यांनी वादी पक्षाची बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी रुपचंद इंगळे यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

टॅग्स :ShegaonशेगावCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेपbuldhanaबुलडाणा