पावसामुळे पिकांना जीवनदान
अंढेरा : अंढेऱ्यासह परिसरातील पिकांची अवस्था चांगली असताना, अचानक पावसाने १५ ते २० दिवस दडी मारली होती. त्यामुळे उभी पिके करपण्याच्या मार्गावर आली होती, परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे व रविवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे सुकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
पात्र लाभार्थ्यांची नावे वगळल्याची तक्रार
बुलडाणा : तालुक्यातील शिरपूर येथे पंतप्रधान आवास याेजनेच्या प्रथम यादीत असलेली पात्र लाभार्थ्यांची नावे दुसऱ्या यादीत वगळण्यात आल्याची तक्रार शत्रुघ्न शेळके यांच्यासह इतर नागरिकांनी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वन्य प्राण्यांचा हैदाेस, मदत देण्याची मागणी
दुसरबीड : परिसरात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस सुरू आहे. वन्य प्राण्यांकडून हाेणाऱ्या नुकसानाची मदतही ताेकडी मिळते. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करा
मेहकर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये हगणदारीमुक्त गाव माेहीम कागदावरच सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.