शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलावंतांची ससेहोलपट, मानधन थकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:01 IST

Khamgaon News मानधनासाठी या कलावंतांचे संबंधित विभागाकडे सातत्याने चौकशीसाठी हेलपाटे होत आहेत.  

 लोकमत न्यूज नेटवर्क    खामगाव : राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन थकीत राहिले आहे. परिणामी, जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांची परवड होत आहे. मानधनासाठी या कलावंतांचे संबंधित विभागाकडे सातत्याने चौकशीसाठी हेलपाटे होत आहेत.    साहित्य व कला क्षेत्रासाठी ज्यांनी १५ ते २० वर्षे महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, ज्या कलावंत, साहित्यिकांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा वृद्ध साहित्यिक व कलावंतांसाठी राज्य शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून मानधन योजना राबविण्यात येते. या योजनेत तीन स्तर करण्यात आले असून, राष्ट्रीय पातळीवरील कलावंत, साहित्यिकास २ हजार १००, राज्य पातळीवरील कलावंतास १ हजार ८००, तर जिल्हा पातळीवरील वृद्ध साहित्य, कलावंतास मासिक दीड हजार रुपये मानधन देण्यात येते.शासनाच्या या योजनेमुळे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाहासाठी काही प्रमाणात मदत होत आहे. साहित्यिक, कलावंताचे निधन झाल्यास त्यांच्या पत्नीस अथवा पतीस हयात असेपर्यंत मानधन देण्यात येते. या मानधनाची रक्कम मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून थेट कलावंतांच्या खात्यावर जमा करण्यात येते. 

पूर्वी जिल्हा परिषदेमार्फत कलावंतांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येत होते. मात्र, आता थेट मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून मानधन जमा करण्यात येत आहे. आमच्याकडे मानधन येत नाही. - मनोज मेरत, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव