बुलडाणा : लोकमतने सुरू केलेल्या मिशन स्वच्छता वृत्तमालिकेअंतर्गत शुक्रवारी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसच्या अस्वच्छतेबाबत वृत्त प्रसिद्ध होताच एसटीच्या अधिकार्यांनी बुलडाणा आगाराला भेट देऊन एसटी बसेसच्या स्वच्छतेचा आढावा घेतला. विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी ठाकूर, एमईओ वाकोडे यांनी बुलडाणा बसस्थानक तसेच डेपोला शुक्रवार ७ नोव्हेंबरला भेट दिली. या भेटीत त्यांनी बसस्थानकाच्या स्वच्छतेची पाहणी केली. याशिवाय एसटी बसेस नियमित स्वच्छ केल्या जातात किंवा नाही, याचाही आढावा घेतला. सध्या बसेस धुण्यासाठी चार कर्मचारी कार्यरत आहेत. आवश्यकता पडल्यास त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचना केल्या. तसेच एसटी बसमध्ये घाण होणार नाही याचीही वेळोवेळी प्रवाशांना वाहकांनी सूचना द्यावी, असेही निर्देश देण्या त आले. आगार व्यवस्थापक किरणकुमार भोसले यांनी प्रतिनिधीशी बोलताना स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लोकवाहिनीसुद्धा स्वच्छ व्हावी हा आम्हा सर्व कर्मचार्यांचा प्रयत्न असल्याचे सांगुण प्रवाशांनीही एसटी बस स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली.
अधिका-यांनी घेतली एसटीची झाडाझडती
By admin | Updated: November 7, 2014 23:25 IST