शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कामुळे खामगाव पालिकेतील लोकप्रतिनिधींसह अधिकारी क्वारंटीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:32 IST

पॉझिटिव्ह रूग्णाच्या हायरिस्क संपर्कात आल्याने पालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिंधीचा  जीव टांगणीला लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  गत दहा दिवसांपासून शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. खामगाव शहरातील रूग्णांची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. एका प्रतिष्ठिता पॉझिटिव्ह रूग्णाच्या हायरिस्क संपर्कात आल्याने पालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिंधीचा  जीव टांगणीला लागला आहे.  मृत व्यक्तीच्या संपर्कातील काही जण पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे अनेकांचा  जीव टांगणीला लागल्याची चर्चा आहे.खामगाव शहरातील एका प्रतिष्ठित वृध्द इसमाचा नुकताच मृत्यू झाला. उपचार सुरू असताना या वृध्दाचा स्वॅब घेण्यात आला. या व्यक्तीचा स्वॉब पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील ७-८ जणांचे स्वाब घेण्यात आले. यापैकी चौघांचे स्वॅब नमुणे पॉझिटिव्ह आले. तर दुसऱ्या भागातील चौघांचे असे सोमवारी एकाच दिवशी ९ जणांचा  अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका प्रतिष्ठित रूग्णाच्या नातेवाईकाच्या हायरिक्स संपर्कात आल्याने खामगाव पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिकेतील पदाधिकारीही अडचणीत सापडले आहेत. पालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह काही अधिकारी, कर्मचारी आणि पालिका पदाधिकारी आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आले. तर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांनी स्वत:हून स्वत:ला क्वारंटीन करून घेतले आहे. क्वारंटीन करण्यात आलेल्यांची आकडेवारी ३४ च्यावर पोहचली असल्याचे एका अधिकाºयांने सांगितले.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या