शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परदेश दौऱ्याची माहिती लपविणाऱ्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:15 IST

मोताला तहसिलदारांच्या निर्देशानुसार हा गुन्हा ६५ वर्षीय व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला आहे

धामणगाव बढे: कोरोना बाधीत देशातून प्रवास करून आल्यानंतरही त्याबाबतची माहिती आरोग्य विभागास न देता ती दडविल्याप्रकरणी धामणगाव बढे येथील एका व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मोताला तहसिलदारांच्या निर्देशानुसार हा गुन्हा ६५ वर्षीय व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी धामणगाव बढे येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून संबंधीत व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामगाव बढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत व्यक्ती १३ मार्च रोजी सौदी अरेबियातून मुंबई विमानतळावर आला होता. १४ मार्च रोजी धामगाव बढे येथे तो आला. कोरोना बाधीत देशातून प्रवास केल्यानंतरही त्या विषयाची माहिती कोरोना नियंत्रण कक्ष व एकात्मिक रोग सर्व्हेक्षण प्रकल्प कक्षास दिल्या गेली नाही. वास्तविक १४ मार्च २०२० च्या अधिसुचनेनुसार ती देणे बंधनकारक आहे. परिणामी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष नारखेडे यांनी संबंधीत व्यक्तीच्या घरी जावून चौकशी केली असता संबंधीत व्यक्तीने कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाले. प्रकरणी संबंधीत व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे मोताळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. एक दिवसा अगोदरच वडगाव खंडोपंत येथील दोघांनी होम क्वारंटीनमध्ये राहण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात २३ मार्च रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरचा हा जिल्ह्यातील दुसरा गुन्हा असून एकट्या मोताळा तालुक्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या