शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:42 IST

डोणगाव (बुलडाणा):  येथील श्री विठ्ठल रूख्माई शाळेच्यावतीने रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली.

ठळक मुद्देश्री विठ्ठल रूख्माई शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरे केले आगळे-वेगळे रक्षाबंधन विद्यार्थ्यांनी घेतली झाडाला राखी बांधून त्यांचे संगोपन करण्याची शपथसंस्थाध्यक्ष आणि शिक्षकवृंदांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव (बुलडाणा):  येथील श्री विठ्ठल रूख्माई शाळेच्यावतीने रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली.प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता सदैव कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शैलेश सावजी होते तर प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव मानवतकर होते. यावेळी मुख्याध्यापक आत्माराम दांदडे व हेमंत जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश सावजी म्हणाले, की रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांने ज्या झाडाला राखी बांधली, त्याचे आयुष्यभर संवर्धन करावे. तसेच अन्यत्रही असलेल्या झाडांचे संवर्धन करावे, सध्या पर्यावरणाचा ºहास मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांच्या कत्तली होत आहे. त्यामुळे झाडांची लागवड करून रक्षण करणे नितांत गरजेचे आहे. संचालन संजीव भारते यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दांदडे यांनी केले.