शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल याेजनेतील अडथळे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:03 IST

Buldhana News घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : घरकुल याेजना राबविताना येणारे अडथळे शासनाच्या महाआवास अभियानामुळे दूर हाेणार आहे. उद्दीष्टाप्रमाणे घरकुलांना १०० टक्के मंजूरी मिळणार असून भूमीहीन लाभार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या वतीने सर्वांसाठी घरे याेजनेंतर्गंत१०० दिवसात लाभ देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत कोरोना संसर्ग सुरक्षा नियम पाळून विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरीय कार्यशाळेत ग्राम कृती गटाची स्थापना करण्यात येणार आहे.  लाभार्थ्यांचे तसेच घरासाठी कर्ज घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बँक मेळावे आयोजित करण्यात येणार आहे.   महाआवास अभियान कालावधीत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हे प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट तालुके प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम तीन व सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल अशा प्रकारात प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट तालुके, ग्रामपंचायत, घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट बँक शाखा, शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट प्रथम तीन कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. या अभियानामुळे रखडलेल्या घरकुल याेजनेला गती मिळणार आहे. तसेच जागा नसलेल्या लाभार्थ्यांनाही लाभ देण्यासाठी विविध याेजना राबवण्यात येणार आहेत.  त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना